सह्याद्री निर्भिड न्यूज
प्रतिनिधी/तानाजी सोडमीसे
शालेय विभागीय कुस्ती स्पर्धेत अनुष्का हास्पे १०/०नी विजय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.
सातारा जिल्ह्याची शान सोमंथाळी चा मान व अभिमान आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती संकुल लोणी देवकर ची खेळाडू पैलवान अनुष्का दत्तात्रय हास्पे हिची विजय घोडदौड चालू दिनांक 30/ 9/ 2024 रोजी भाळवणी पारनेर येथे झालेल्या शालेय विभागीय कुस्ती स्पर्धेत नेत्र दीपक अशा कुस्त्या करत शालेय स्पर्धेतील विजय घोडदौड कायम राखले तिने सेमी फायनल कुस्ती 20 सेकंदाच्या आत करून अहमदनगर जिल्ह्यातील पै श्वेता लोणारी हिला पराभूत केले व फायनल मध्ये सोलापूर जिल्ह्यातील पै अश्विनी शिंदवडकर हिला 3 मिनिटाच्या आत 10/0 फरकाने पराभूत करून गोल्ड मेडल प्राप्त केले व उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळवली व पुढील होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाली तिच्या यशा मागे तिचे गुरु कै, खाशाबा करचे (बापु)व आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती संकुल चे कोच पैलवान प्रकाश कोळेकर, पै बापू कोळेकर, पै समाधान खांडेकर, संस्थापक अध्यक्ष अमोल तोरवे सरपंच व विद्या प्रतिष्ठान बारामतीचे मिटकरी सर यांनी मार्गदर्शन केले तिच्या यशाबद्दल सोमंथळी ग्रामस्थांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments