सह्याद्री निर्भिड न्यूज
संपादक -वैभव जगताप
जागतिक जेष्ठ नागरीक दिनानिमित्त सातारा जिल्हा पोलीस दलाचे जेष्ठ नागरीक कायदा व हेल्पलाईन बाबत मार्गदर्शन.
जागतिक जेष्ठ नागरीक दिनानिमित्त सातारा जिल्हा पोलीस दलाचे वतीने जेष्ठ नागरीकांना
जेष्ठ नागरीक कायदा व हेल्पलाईन बाबत मार्गदर्शन
दिनांक ०१/०९/२०२४ रोजी जागतिक जेष्ठ नागरीक दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हा पोलीस दलाचे
वतीने आर.सी.पी.हॉल पोलीस मुख्यालय सातारा येथे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली
श्रीमती वैशाली कडूकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. अतुल सबनीस पोलीस उपअधीक्षक (गृह)यांचे
उपस्थितीत जागतिक जेष्ठ नागरीक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. नमुद कार्यक्रमास सातारा जिल्हयातील
महिला व पुरुष जेष्ठ नागरीक उपस्थित होते. श्रीमती वैशाली कडूकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. अतुल
सबनीस पोलीस उपअधीक्षक (गृह) व श्री. अरुण देवकर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी पोलीस
दलाचे वतीने जेष्ठ नागरीकांच्या तक्रारी व अडीअडचणी जाणून घेतल्या.
भरोसा सेल सातारा येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी जेष्ट नागरीकांना जेष्ठ नागरीक कायदा
२००७ मधील तरतुदीबाबत सविस्तर माहिती दिली, आणि दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी सातारा जिल्हा
पोलीस दलामार्फत आयोजित संवाद तक्रारदारांशी हा उपक्रम जिल्हयातील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे
कार्यालयात राबविणेत येत असून सदर उपक्रमामध्ये तक्रारदारांच्या तक्रारीची योग्य व कायदेशीर दखल घेतली जाते
याबाबत माहिती दिली तसेच जेष्ट हक्कांबाबत त्यांना मार्गदर्शन केले जेष्ट नागरीकांच्या अडीअडचणीचे अनुशंगाने
त्यांना तात्काळ पोलीस मदत मिळणेकामी ११२ वर संपर्क करणेबाबत सुचना दिल्या. तसेच जिल्हा पोलीस दलाचा
हेल्पलाईन क्र.१०९० हा सतत २४ तास जेष्ट नागरीकांकरीता उपलब्ध असल्याबाबत माहिती दिली. त्यावेळी उपस्थित
जेष्ट नागरीकांनी आपले मनोगत व्यक्त करुन जिल्हा पोलीस दलाचा हा अभिनव उपक्रम असलेचे सांगून, जेष्ट
नागरीकांना मोठा आधार असल्याचे विचार व्यक्त केले आहेत.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती वैशाली कडूकर अपर पोलीस
अधीक्षक सातारा, श्री.अतुल सबनीस पोलीस उपअधीक्षक (गृह), श्री. अरुण देवकर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे
शाखा सातारा, श्रीमती श्वेता पाटील पोलीस उपनिरीक्षक, जेष्ट नागरीक कक्षाचे पोलीस अंमलदार नंदकुमार
चव्हाण, विनायक राऊत, परशुराम वाघमारे, शुभांगी पवार, अंजली लोखंडे, तृप्ती मोहिते यांनी कार्यक्रमाचे आयोजन करुन
जिल्हा पोलीस दलाचे वतीने जेष्ठ नागरीकांना मार्गदर्शन केले आहे.
Post a Comment
0 Comments