Type Here to Get Search Results !

सातारा पोलीस दलातील महीला पो.कॉ.पुजा शिंदे यांनी क्रिडा स्पर्धेत मिळवले कास्य पदक.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

सातारा पोलीस दलातील महीला पो.कॉ.पुजा शिंदे यांनी क्रिडा स्पर्धेत मिळवले कास्य पदक.


सातारा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा..!

सातारा जिल्हा पोलीस दलामधील बॉक्सींग खेळाडु महिला पोलीस कॉन्स्टेबल पुजा शंकर शिंदे

बनं/८४ यांनी ७३ वी अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर २०२४ लखनऊ, उत्तरप्रदेश येथे

पार पडलेल्या क्रिडा स्पर्धेत कास्य पदक मिळवून सातारा पोलीस दलाचे नाव लौकिक केले

आहे.

सातारा जिल्हा पोलीस दलातील खेळाडु महिला पोलीस कॉन्स्टेबल पुजा शंकर शिंदे

बनं/८४ यांनी नुकत्याच पार पडलेल्या ७३ वी अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर २०२४

लखनऊ, उत्तरप्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या बॉक्सींग या खेळप्रकारात ६३ किलो वजनी

गटामध्ये कांस्य पदक प्राप्त करुन महाराष्ट्र पोलीस दलाचे तसेच सातारा पोलीस दलाचे

नावलौकीक केले आहे.

महिला पोलीस कॉन्स्टेबल पुजा शंकर शिंदे बनं / ८४ यांना श्री. राजु शिंदे, राखीव

पोलीस निरीक्षक, श्री. चंद्रकांत भोसले, राखीव पोलीस उपनिरीक्षक, श्री. सुनिल चिखले पोलीस

उपनिरीक्षक, पोलीस कल्याण व मानवी संसाधन कार्यालय, सातारा, श्री. सुनिल सपकाळ,

स्पोर्टस इंचार्ज व श्री. शमुवेल भोरे सहा. स्पोर्टस इंचार्ज यांनी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले.

सातारा जिल्हा पोलीस दलातील खेळाडु महिला पोलीस कॉन्स्टेबल पुजा शंकर शिंदे

बनं/८४ यांना श्री.समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर

पोलीस अधीक्षक, सातारा, श्री. अतुल सबनीस पोलीस उप अधीक्षक (गृह), यांनी सदर

उल्लेखनिय कामगिरीबाबत "हार्दिक अभिनंदन" केलेले आहे. तसेच यापुढील स्पर्धेसाठी त्यांना

शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Post a Comment

0 Comments