Type Here to Get Search Results !

फलटण शहरात घरफोडीच्या प्रमाणात वाढ, फलटण पोलिसांचे सतर्क राहण्याचे आवाहन.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

फलटण शहरात घरफोडीच्या प्रमाणात वाढ, फलटण पोलिसांचे सतर्क राहण्याचे आवाहन.


(फलटण शहरात होणा-या घरफोडीच्या अनुषंगाने दक्षता घेण्याचे आवाहन)

दि.२६/०९/२०२४ रोजी सायंकाळी ०७.०० वाजता ते दि. २७/०९/२०२४ रोजी स.०८.०० वा. च्या दरम्यान

मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण येथील श्री सोनाजी अश्रुबा घोळवे, वय ३२ वर्षे यांच्या घराचे कुलूप तोडुन अज्ञात आरोपीने

घरात प्रवेश करुन, घरातील रोख रक्कम व चांदीचे दागिने असा असा एकुण रु. ४१,५००/- चा मुद्देमाल चोरुन नेला आहे.

सदरबाबत फलटण शहर पोलीस ठाणे येथे गु. नों.क्र.४८८/२०२४, कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५(अ) भारतीय न्याय

संहीता, २०२३ अन्वये गुन्हा दाखल असुन, सदर गन्ह्याचा तपास पो.ना. हेमा पवार, नेमणूक - फलटण शहर पोलीस ठाणे या

करीत आहेत.

वरील घटनेच्या अनुषंगाने की, सन २०२३ मध्ये फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत एकुण ३२ घरफोडी-चोरीचे गुन्हे घडले

होते. त्यापैकी १४ गुन्हे उघडकीस आले होते. गत वर्षाची तुलना करता, सन २०२४ मध्ये घरफोडी चोरीच्या गुन्हयांचे प्रमाण कमी

आहे. परंतु अलीकडील कालावधीत अशा घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये तुलनात्मक दृष्ट्या वाढ होत असल्याचे दिसन्न आले आहे.

सन २०२४ मध्ये महिना निहाय जानेवारी मध्ये १ फेब्रुवारी मध्ये १, मार्च मध्ये ०, एप्रिल मध्ये ३, मध्ये १, जुन मध्ये

२, जुलै मध्ये ३, ऑगस्ट मध्ये ० आणि सप्टेंबर मध्ये ३ गुन्हे घडल्याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत. या पैकी माहे एप्रिल मध्ये

दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी एक गुन्हा उघडकीस आला असुन, त्यामध्ये आरोपी नामे स्वप्नील उर्फ काळु सुरेश जाधव आणि

निखील उर्फ बाळू सुरेश जाधव, दोघे रा. तावडी, ता. फलटण यांना अटक केली होती.

माहे सप्टेंबर, २०२४ मध्ये आज पर्यंत तीन गुन्हे घडले असुन, यापैकी कोळकी येथील दहीवडी चौक ते कोळकी रोड

येथील पत्र्याचे मोठ्या दुकानातुन हार्डवेयरचे एकुण रु. १३,७१,८१६/- किंमतीचे साहीत्य चोरीस गेले आहे.

घरफोडी-चोरीमध्ये बंद घरात घरफोडी चोरीचे प्रमाण जास्त आहे. या अनुषंगाने सर्व नागरिकांना खालील प्रमाणे मुलभुत

दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

(१) घरातुन बाहेर जाताना, कुलुप लाऊन जावे. आपण घरी नसल्याबाबत शेजारील विश्वासू व्यक्तींना सांगावे.

(२) अपार्टमेंट असलेल्या ठिकाणी वॉचमन ठेवावेत.

(३) सीसीटीव्ही लावावेत. याचे डीव्हीआर सुरक्षीत ठिकाणी दुसरीकडे ठेवावेत. जेणेकरुन डीव्हीआर चोरीस जाणार

नाहीत.

(४) घरात मौल्यवान वस्तु ठेऊ नयेत.

(५) मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घरी ठेऊ नये.

(६) कोणासही संशयास्द हालचाली दिसल्यास, ११२ या क्रमांकावर माहिती द्यावी.

Post a Comment

0 Comments