Type Here to Get Search Results !

मोल मजुरी करणाऱ्या आईचे स्वप्न मुलीने केले पूर्ण.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

सोमंथळी/तानाजी सोडमीसे 

मोल मजुरी करणाऱ्या आईचे स्वप्न मुलीने केले पूर्ण. 


 

अवघ्या २० व्या  वर्षी महाराष्ट्र पोलीस (पुणे ग्रामीण), पदी निवड बारामती तालुक्यातील मोराळवाडी (कारंडे मळा) येथील सानिया सतीश कारंडे यांची आई वनिता कारंडे हया मोल मजुरी करणाऱ्या आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करत महाराष्ट्र पोलीस (पुणे ग्रामीण) पदी पहिल्याच प्रयत्नात निवड 

सानिया ही  पुणे ग्रामीण पोलीस पदावर विराजमान होणार आहे सध्या ती बीएससी लास्ट इयर मध्ये शिकत आहे. बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने कष्टाने आणि जिद्दीने पोलीस व्हायचं या दृष्टीने सराव व अभ्यास केला मुलीला वर्दी मिळालीच पाहिजे हे आईचे स्वप्न तिने पूर्ण केले आईचे हे स्वप्न उराशी बाळगून रात्रंदिवस अभ्यास करून अवघ्या एका वर्षात महाराष्ट्र पोलीस पुणे ग्रामीण या पदासाठी गवसणी घातली.

वयाच्या सातव्या वर्षीच सानिया ही वडिलांच्या दुःखद निधनानंतर आई मामा चुलता यांच्या मार्गदर्शनाखाली वाढली

मोलमजुरी करणाऱ्या आईचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मोराळवाडी (कारंडे मळा) ग्रामस्थांच्या वतीने सानिया कारंडे हिची भव्य मिरवणूक व सत्कार कार्यक्रम शनिवार दिनांक २८/९/२०२४ रोजी संध्याकाळी सात वाजता करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments