Type Here to Get Search Results !

सोमंथळी गावातील स्मशानभूमीची दुरवस्था गवत व झुडपांचे साम्राज्य.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

सोमंथळी/तानाजी सोडमीसे 

सोमंथळी गावातील स्मशानभूमीची दुरवस्था गवत व झुडपांचे साम्राज्य.



सोमंथळी स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय असून स्मशानभूमी कडे जाण्याचा मार्ग बऱ्याच ठिकाणी खचला आहे स्मशानभूमीत झाडा झुडपांचे साम्राज्य असल्याचे चित्र दिसत आहे. गावातील विकासावर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जात असले तरी सगळ्यांचा अति महत्त्वाचा प्रश्न असलेल्या स्मशानभूमी  विकासाकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

गावाच्या प्राथमिक सुविधे पैकी (Rural Cemetery) स्मशानभूमी ही महत्त्वाची गरज असताना आजही गावात दुसरी मशानभूमी बनवलेली नाही आहे तिची ही दूरवस्था घरात दुःखाचे सावट असताना नागरिक मिळेल त्या जागेत मरणयातना भोगत अंत्यविधी उरकताना पहावयास मिळत आहे. स्मशानभूमीला जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी बसण्यासाठी व उभे राहण्यासाठी निवाऱ्याची सोय नाही स्मशानभूमीत काटेरी झुडपे गवत तरोटा यांचेच साम्राज्य आहे. जीव मुठीत ठेवून नदी मधून पाणी आणावे लागत आहे. पाण्याची गैरसोय रात्रीच्या वेळी अंत्यविधी करायचा असेल तर वीज पुरवठा नसल्याने धोका पत्करून काळोखात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत 'याच साठी केला होता अट्टाहास शेवटचा दिनु गोड व्हावा... ही प्रत्येकाची इच्छा असते परंतु मेल्यानंतर सुद्धा मरणयातना भोगाव्या लागत असल्याचे विदारक चित्र सोमंथळीत पाहायला मिळत आहे. 

प्रशासन व लोकप्रतिनिधींनी सोमंथळीतील स्मशानभूमी विकास निधी मधून ग्रामपंचायत मार्फत स्मशानभूमी विकास कार्यक्रम राबवावा अशी मागणी सोमंथळीतील ग्रामस्थांची आहे.

Post a Comment

0 Comments