सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
खुंटे विविध कार्यकारी सह.सेवा सोसायटीच्या सभासदांना 15 टक्के डिव्हिडंड -चेअरमन श्री.अविनाश खलाटे
खुंटे विविध कार्यकारी सह. सेवा सोसायटी लि.खुंटे या संस्थेची 55 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 26 9 2024 रोजी अध्यक्ष श्री अविनाश पांडुरंग खलाटे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. संस्थेचे भाग भांडवल रुपये 93 लाख 15 हजार 358 इतके आहे, रिझर्वफंड 47 लाख 35 हजार 315 व इतर निधी 30 लाख 15 हजार 10 एवढे आहेत. संस्थेच्या 419 सभासदांना कर्ज रक्कम रुपये सात कोटी दहा लाख 81 हजार 798 कर्ज वाटप केलेले आहे. संस्थेचा ऑडिट वर्ग अ आहे.संस्थेत दिनांक 31 3 2024 अखेर एकूण 21 लाख 45 हजार 610 नफा झालेला असून यावर्षी सभासदांना 15 टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेमध्ये पाणी फिल्टर चा प्लांट असून त्याचा नफा 99 हजार 511 रुपये झालेला आहे. संस्थेने तक्रार निवारण समितीची स्थापना वार्षिक मीटिंगमध्ये केलेली असून या तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी श्री शिवाजी भिसे व सदस्य पदी श्री प्रदीप खलाटे व श्री माणिकराव खलाटे यांची एकमताने निवड केलेली आहे .संस्थेने कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासद यांना उत्कृष्ट सेवा सुविधा देऊन संस्थेची व्यवसाय वृद्धी करीत कर्जवाटप, कर्ज वसुली , नफ्यात सातत्य ठेवत सभासदांना लाभांश वाटप व उत्तम व्यवस्थापन यामध्ये सातत्य राखत जिल्हास्तरावरील आदर्शवत कामकाज केलेले असल्यामुळेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने फलटण तालुक्यातून तालुका स्तरावरील प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करून गौरवण्यात आले आहे. हे सर्व यश संस्थेचे सर्व सभासद संचालक मंडळ व संस्थेची सेवक वर्ग, यांच्या सहकार्यामुळे शक्य झालेले आहे.
संस्थेस माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य ,माननीय आमदार दीपक चव्हाण, माननीय श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर, माननीय श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर तसेच श्री अच्युतराव खलाटे, दिलीपराव खलाटे ,सदाशिवराव खताळ ,श्रीमंत खलाटे व संस्थेचे सर्व जेष्ठ सभासद ,सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक ,व्यवस्थापक, विभागीय विकास अधिकारी, विक्री अधिकारी व शाखाप्रमुख तसेच संस्थेचे लेखापरीक्षक, मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था फलटण यांनी संस्थेस वेळोवेळी येणारे अडचणी सोडवून बहुमोल असे मार्गदर्शन केले आहे.
Post a Comment
0 Comments