सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
फलटण येथे बैलगाडी शर्यतीच्या वादातून एकास कोयता व काठीने मारहाण.
दि.25/9/2024 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मौजे जाधववाडी ता.फलटण जि.सातारा येथे डॉ.किरण शेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जाधववाडी येथील साईबाबा मंदिरासमोरील मैदानावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते त्याच शर्यतीच्या दरम्यान विजय बबन मदने वय 35 वर्ष, व्यवसाय शेती रा.उमाजी नाईक चौक फलटण यास बैलगाडी एकाच गटातुन पळवू नकोस असे म्हणत१) मारुती पांडुरंग खोमणे २) ऋषी तानाजी जाधव ३) विशाल विठ्ठल कडाळे ४) शामराव मदने ५)हनुमंत शिवाजी जाधव ६)तेजस मारुती खोमणे व इतर तीन(नाव माहीत नाही) हे सर्व रा. कोऱ्हाळे खुर्द या. बारामती जि.पुणे या सर्वांनी मला शिवीगाळ करत कोयत्याने, काठीने, हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल केली असून या सदर घटनेचा अधिक तपास म.पो.ना.पुनम तांबे ह्या करत आहेत.
Post a Comment
0 Comments