सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
मोटरसायकल चोरणाऱ्या 3 आरोपींच्या कडून 3,55,000/- रु, किंमतीच्या 5 मोटरसायकली बोरगाव पोलिसांच्या कडून हस्तगत.
(बोरगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगिरी )
( पोलीस अभिलेखावरील अट्टल मोटारसायकल चोरटे जेरबंद करुन गुन्ह्यातील चोरीस गेलेली होन्डा कंपनीची
युनीकोर्न मोटारसायकल व आणखी 4 दुचाकी मोटारसायकली असा एकुण 3,55,000/- रु तीन लाख पंच्चावन
हजार रुपये किंमतीची मोटारसायकली केल्या जप्त )
मा. श्री समीर शेख पोलीस अधिक्षक सो सातारा व श्रीमत डॉ. वैशाली कडुकर अप्पर अधिक्षक सातारा यांनी
घरफोडी,चोरी,मोटारासयकल चोरी, असे गुन्हे उघडकीस आणुन चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करुन गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या
सुचना श्री राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा यांना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने श्री रविंद्र तेलतुंबडे
सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरगाव पोलीस ठाणे यांनी बोरगाव गुन्हे प्रकटीकरण शाखा यांना कारवाईबाबतच्या सुचना दिल्या होत्या.
बोरगाव पोलीस ठाणे गुरनं- 417/2024 भा.न्या.सं.कलम-303 (2) प्रमाणे दिनांक- 10/09/2024 रोजी मौजे माजगाव
ता.जि. सातारा गावच्या हद्दीतील वरदराज पेट्रोलपंप येथुन एक होन्डा कंपनीची काळ्या रंगाची युनिकॉर्न क्रमांक MH11BC-5262 ही
चोरीस गेलेबाबतचा गुन्हा दाखल झाला होता. त्याबाबत श्री. रविंद्र तेलतुंबडे सहा.पोलीस निरीक्षक बोरगाव पोलीस ठाणे यांनी गुन्हे
प्रकटीकरण शाखेचे पोलीस नाईक प्रशांत चव्हाण,पोकॉ केतन जाधव यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत योग्य त्या सुचना दिल्या
होत्या. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना खोजेवाडी ते अपशिंगे जाणारे रोडवर आंबेवाडी
गावाजवळ पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार हे एक होन्डा कंपनीची काळ्या रंगाची युनिकॉर्न विना नंबरप्लेट असलेली मोटारसायकलवरुन
जात असताना दिसले. त्यांचा संशय आल्याने त्यांना थांबवुन त्यांचेकडे सदर मोटारसायकल व तिचे कागदपत्राबाबत विचारणा केली
असता ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागल्याने त्यांना विश्वासात घेवुन अधिक चौकशी केली असता आम्ही अजुन एका मित्राचे सोबत ही
मोटारसायकल मौजे माजगाव ता. जि. सातारा गावच्या हद्दीतील वरदराज पेट्रोलपंपावरुन चोरली असुन अजुन 4 मोटारसायकली सातारा
परीसरातुन चोरुन आणुन मौजे आंबेवाडी ता.
जि. सातारा गावच्या हद्दीत मित्राचे शेडात लपवुन ठेवलेल्या आहेत असे सांगितलेने सदर
ठिकाणी जावुन खात्री केली असता 4 मोटारसायकली मिळुन आल्या. सदर वाहनांचा पंचनामा करुन सर्व 5 मोटारसायकली जप्त
करण्यात आलेली आहेत. सदर इसमांनी मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करुन त्यांचेकडुन
बोरगाव पोलीस ठाणे गुन्ह्यातील चोरीस गेलेली एक होन्डा कंपनीची काळ्या रंगाची युनिकॉर्न तसेच इतर 4 मोटारसायकली अशा
3,55,000/- रू किंमतीच्या मोटारसायकली हस्तगत केलेल्या आहेत. सदर वाहनांची माहिती खालीलप्रमाणे आहे
1) 70,000/- एक होन्डा कंपनीची काळ्या रंगाची युनिकॉर्न क्रमांक MH11BC-5262 असलेली जु.वा. किं.अं.
2) 70,000/- एक काळ्या रंगाची हीरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल नंबर प्लेट नसलेली, चेसी नं.-
MBLHA10AMFHA13806, व इंनि नं. Ha10JFHA04109 अशा वर्णनाची मोटार सायकल, जु.वा. किं. अं.
3) 70,000/- एक हीरो कंपनीची काळया रंगाची भगवा पट्टा असलेली स्प्लेंडर प्लस मोटारसायकल नंबर प्लेट नसलेली,
चेसी नं.- 01H20C17056, व इंनि नं. 01H18 16797 अशा वर्णनाची मोटार सायकल, जु.वा.किं. अं
4) 80,000/- एक काळ्या रंगाची रंगाची हीरो कंपनीची हिरो स्प्लेंडर प्रो मोटार सायकल नोंदणी क्र. MH-11-CY-7995
तीचा चेसीसी नं. MBLHA10CAFHK42958 व इंजिन नं.- HA10EYFHK73349 अशा वर्णनाची मोटार सायकल
5) 65,000/- एक लाल रंगाची हीरो कंनरीची प्लेजर मोपेड स्कुटर तीचा चेसीस नं.- MBUF16ECAGA14904 व तीचा
इंजिन नं.JF16EAAGA14730 अशा वर्णनाची मोपेड स्कुटर, जु.वा. किं. अं. अशा मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.
सदरची कारवाई ही मा. श्री समीर शेख पोलीस अधिक्षक सो सातारा व श्रीमत डॉ. वैशाली कडुकर अप्पर अधिक्षक
सातारा, श्री राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा व श्री रविंद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे
सुचनेप्रमाणे व मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस नाईक प्रशांत चव्हाण,पोकॉ केतन जाधव, पोकॉ संजय जाधव, पोकॉ
विशाल जाधव, यांनी सदरच्या कारवाईत सहभाग घेतलेला आहे. सदरचा तपास सफी दबडे-पाटील हे करीत आहेत.
आरोपीचे नाव-
1) विशाल सुभाष कांबळे वय-26 वर्षे रा-आंबेवाडी ता. जि. सातारा
2) अविनाश मोहन ढाणे वय-32 वर्षे रा-माजगाव ता.जि.सातारा.
3) अजय राजेंद्र जाधव वय-32 वर्षे रा-आंबेवाडी ता.जि. सातारा
Post a Comment
0 Comments