Type Here to Get Search Results !

क्रेन चोरटा मल्हारपेठ पोलीसांच्या ताब्यात

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

क्रेन चोरटा मल्हारपेठ पोलीसांच्या ताब्यात.



दि.१९/०९/२०२४ रोजी सकाळी ०८.३० वा. चे सुमारास मल्हारपेठ पोलीस ठाणे हद्दीमध्ये सहाय्यक पोलीस

निरीक्षक चेतन मछले सो, पोलीस उपनिरीक्षक सुनिता शेळके सो. सहा. फौजदार प्रदिप साळवी, पो. हवा. ६८९ संजय

मोरे, होम. ८४२८ प्रदिप निकम पेट्रोलींग ड्यूटी करत असताना मौजे मरळी ता.पाटण गावचे हदीमध्ये मरळी ते

ढेबेवाडी जाणारे रोडवर सुतारमळा येथे टोइंग क्रेन क्र.एम.एच.०९ सी.ए.६३०६ ही उभी असल्याचे दिसले असता

तेथे जावुन चौकशी केली त्यावेळी त्याच्या हालचाली संशयास्पद दिसलेने आरोपी  रविंद्र विठ्ठल चोरगे वय २१ वर्षे, रा. चोरगेवाडी (कुंभारगाव), ता. पाटण, जि. सातारा यास जागीच पकडुन त्याचेकडे चौकशी

केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यानंतर सदर इसमाकडे अधिक चौकशी करता पोलीस ठाणेस

आलेनंतर त्याचे ताब्यातील टोइंग क्रेन नं. एम.एच.०९ सी.ए.६३०६ किंमत अंदाजे ७०००००/-रू (सात लाख)

किमतीची क्रेन कराड शहर येथुन चोरी केली असल्याचे कबुली दिली. सदर टोइंग क्रेन ची कराड शहर पोलीस ठाणे

कडुन अधिक माहिती घेतली असता कराड शहर पोलीस ठाणे गुन्हां रजि.नं. १२८७/२०२४

भा.न्या. संहिता. कलम.३०३(२) दि.१९/०९/२०२४ रोजी गुन्हां दाखल झालेचे निष्पन्न झालेने सदर आरोपी व

टोइंग क्रेन ही पुढील कारवाई करता कराड शहर पोलीसांचे ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई मा.समीर शेख पोलीस अधिक्षक सो, सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर अप्पर पोलीस

अधिक्षक सो, सातारा.मा.विजय पाटील पोलीस उपअधिक्षक सो, पाटण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस

निरीक्षक चेतन मछले सो. पोलीस उपनिरीक्षक सुनिता शेळके, सहा. फौजदार प्रदिप साळवी, पो. हवा. ६८९ संजय मोरे,

होम ८४२८ प्रदिप निकम यांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments