सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/वैभव जगताप
खेलो इंडिया या राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी साखरवाडी विद्यालयातील कुमारी दिशा बोंद्रेची अभिनंदनीय निवड.
गुजरात मधील वडोदरा येथे होणाऱ्या राष्ट्रीय खेलो इंडिया या खो खो स्पर्धेसाठी साखरवाडी विद्यालयातील इयत्ता ७ मधील कुमारी दिशा राहुल बोंद्रे या विद्यार्थिनीची अभिनंदनीय निवड झाली आहे.तिला शाळेचे माजी खो खो खेळाडू हर्षद मोहिते व विवेक भोसले यांनी मार्गदर्शन केले.तिच्या या कौतुकास्पद निवडीबद्दल तिचे व मार्गदर्शक माजी विद्यार्थ्यांचे साखरवाडी शिक्षण संस्था विश्वस्त समिती अध्यक्ष माननीय श्री प्रल्हाद रावजी साळुंखे पाटील , संस्था अध्यक्ष माननीय श्री धनंजय दादा साळुंखे पाटील , संचालक माननीय श्री राजेंद्र शेवाळे , श्री राजेंद्र भोसले , श्री कौशल भोसले तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिलाताई जगदाळे , पर्यवेक्षक श्री तुळशीदास बागडे व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments