Type Here to Get Search Results !

फळांचे गाव धुमाळवाडी गावातील प्रगतशील शेतकरी महेंद्र देवराव धुमाळ यांनी डाळिंब फळाचे घेतले उच्चांकी उत्पादन.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

फळांचे गाव धुमाळवाडी गावातील प्रगतशील शेतकरी महेंद्र देवराव धुमाळ यांनी डाळिंब फळाचे घेतले उच्चांकी उत्पादन.



फलटण - सन 1985 रोजी डाळींब लागवड असलेले धुमाळवाडी गावात प्रथम लागवड करण्याचा मान त्याचें वडील देवराव धुमाळ यांनी 0.30 क्षेत्रावर गणेश जातींचे डाळींब लागवड केले होते 

डाळींब फळपीक मधून चांगले उत्पादन मिळाले 

फळांचे गाव धुमाळवाडी गावचे प्रगतशील शेतकरी महेंद्र देवराव धुमाळ नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित  शेती आधुनिक तंत्रज्ञान वापरून डाळिंबाचे भरघोस उत्पादन घेत आहे त्यांनी 2.00 हेक्टर क्षेत्रावरती डाळिंब आणि सीताफळ 0.40 वरती लागवड केली आहे ज्वारी बाजरी मका सारख्या तृणधान्य पिके न घेता फळ पिकाच्या माध्यमातून भरघोस उत्पादन असे उत्पादन घेऊन इतर शेतकऱ्यांना डाळिंब लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे यांच्या डाळिंब गेल्या वर्षी डाळिंबाला जास्तीत जास्त दर उच्चांकी दर 150 रुपये व कमीत कमी 115 प्रति किलो दर मिळाला आहे 

 स्व. यशवंतराव चव्हाण कृषी व पशुपक्षी प्रदर्शन मध्ये सन 2022 2023 ते 2023-2024 मध्ये फळपीक स्पर्धा मध्ये डाळींब फळपीक प्रथम क्रमांक विजेते आहे

तसेच  कृषी व औद्योगिक महोत्सव कराड 2023-2024 मध्ये फळपीक स्पर्धा मध्ये डाळींब फळपीकाने प्रथम क्रमांकविजेते झाले 

तसेच राज्यस्तरीय सेवागिरी कृषी व पशुपक्षी प्रदर्शन 2022 अंतर्गत शेती निष्ठ कृषी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला 

 परिसरातील शेतकऱ्यांना डाळिंब लागवड विषयी मार्गदर्शन केल्यामुळे डाळिंबाचे क्षेत्र वाढण्यास मदत झाले 

 संपूर्ण शेती ठिबक सिंचना वरती केली आहे कृषी विभागाची योजनेचा जोड घेऊन फळबाग लागवड केलेली आहे संपूर्ण डाळिंब झाले मुक्त बाग ठेवण्यात त्यांना यश मिळालेले आहेत 

 डाळिंब लागवडीचे प्लॉट पाहण्यासाठी शेतकरी वर्ग भेटी देऊन त्यांचे कौतुक करत आहेत आणि मार्गदर्शन घेऊन डाळींब फळबाग लागवड करत आहेत

Post a Comment

0 Comments