सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
गणेश उत्सव अनुषंगाने लोणंद पोलीस स्टेशन हददीतुन एकुण 36 गुन्हेगारांना केले हददपार.
लोणंद पोलीस स्टेशन हददीत उपद्रव करणारे तसेच सामाजीक शांतता बिघडवणारे
इसमांविरुदध मा. पोलीस अधीक्षक सातारा श्री समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, मा.
उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग श्री राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली श्री सुशिल बी. भोसले सपोनि.
लोणंद पोलीस स्टेशन यांनी कडक कारवाई करुन गणेश उत्सव काळात त्यांचे हातुन कायदा व सुव्यवस्थेचा
प्रश्न निर्माण होवु नये म्हणुन मा. उपविभागीय अधिकारी तथा दंडाधीकारी फलटण श्री सचिन ढोले, मा.
उपविभागीय अधिकारी तथा दंडाधीकारी वाई श्री राजेंद्र कचरे, खंडाळा तहसीलदार श्री अजित पाटील यांचेकडुन
36 गुन्हेगारांवर हददपार करण्याचा आदेश प्राप्त करुन घेतला असुन सदर गुन्हेगार यांना त्याची बजावणी
करण्यात आली आहे. सदर इसमांना आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यांनी संबंधीत पोलीस स्टेशनला हजेरी
लावण्याची आहे. हददपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांनी दिनांक 15/9/2024 ते दिनांक 18/5/2024 रोजी
पर्यंत या दरम्यान लोणंद पोलीस स्टेशनच्या हददीत प्रवेश केल्यास त्यांचेवर प्रचलित कायदयाप्रमाणे कारवाई
करण्यात येईल.
सदर कारवाईमध्ये सपोनि श्री सुशिल बी. भोसले, पोहवा नितीन भोसले, पोना. सतिष दडस, मपोहवा
शुभांगी धायगुडे, मपोकॉ. प्रियांका नरुटे, मपोकॉ. अक्षता अहिवळे, मपोकॉ. शुभांगी शिंदे यांनी सहभाग घेतला आहे.
Post a Comment
0 Comments