सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
पाचगणी पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी.
( पाचगणी पोलीसांनी २४ तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणुन हिरेजडीत सोन्याचे
अंगठया केल्या हस्तगत, मोटर सायकल चोरीचे २ गुन्हे उघडकीस आणुन २ मोटर सायकली केल्या
हस्तगत तसेच चालु वर्षात एकुण ३५ गहाळ मोबाईलचा शोध लावुन एकुण ५,१०,०००/- रू चा माल
हस्तगत)
दि.१०.०९.२०२४ रोजी सायं ७.३० वा.चे सुमारास शिवाजी चौक पाचगणी येथील लक्ष्मी
स्टोअर समोर गॅबरेल फ्रांसीस जोसेफ रा. सिध्दार्थनगर पाचगणी ता. महाबळेश्वर यांनी त्यांच्या
मालकीची अंदाजे ५०,०००/- रू किंमतीची हिरो कंपनीची प्लेझर मोटर सायकल क्रमांक एमएच ११
सीपी ८८७८ ही पार्क केलेली मोटर सायकल अज्ञात चोरटयाने चोरून नेहलेबाबत पाचगणी पोलीस
ठाणे अज्ञात चोरटया विरूध्द दि. ११.०९.२०२४ रोजी गु.र.नं. २२१ / २०२४ भा.न्या.सं. कलम ३०३ ( २ )
प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पाचगणी पोलीस ठाणे नेमणुकीचे
पोलीस नाईक तानाजी शिंदे ब. क्र. ९६२ हे करीत आहेत.
तसेच दि.३०.०८.२०२४ रोजी सायंकाळी १९.३० ते १९.४५ वा.चे दरम्यान पाचगणी येथील
अविराम मेडिकल येथे एकनाथ काशिनाथ पवार रा. खिंगर ता. महाबळेश्वर यांनी त्यांच्या मालकीची
अंदाजे ४०,०००/- रू किंमतीची हिरोहोंडा कंपनीची सिडी डॉन मोटर सायकल क्रमांक एमएच ११
एसी २७१ ही पार्क केलेली मोटर सायकल अज्ञात चोरटयाने चोरून नेहलेबाबत पाचगणी पोलीस ठाणे
अज्ञात चोरटया विरूध्द दि. १३.०९.२०२४ रोजी गु.र.नं. २२४ / २०२४ भा. न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पाचगणी पोलीस ठाणे नेमणुकीचे पोलीस
नाईक तानाजी शिंदे ब. क्र. ९६२ हे करीत आहेत.
दि.१२.०९.२०२४ रोजी सकाळी ०९.०० ते ०९.३० वा. चे दरम्यान पाचगणी येथील हॉटेलमध्ये
मुक्कामी असलेले पर्यटकाचे हॉटेलचे रूममधुन ७०,०००/- रू किंमतीच्या हिरेजडीत सोन्याच्या दोन
अंगठया चोरीस गेल्या होत्या त्याबाबत फिर्यादी इंदुबेन जगदीश ठक्कर रा. कांदीवली मुंबई यांनी दिले
तक्रारीवरून पाचगणी पोलीस ठाणेस दि.१२.०९.२०२४ रोजी गु.र.नं. २२३/२०२४ भा.न्या.सं.कलम
३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार श्रीकांत
कांबळे हे करीत आहेत.
सदर गुन्हयातील अज्ञात चोरटयाबाबत तसेच गेले मालाबाबत शोध लागावा याकरीता
गुन्हयाच्या तपासाबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. समिर शेख सो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती
वैशाली कडुकर मॅडम, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. बाळासाहेब भालचिम सो यांनी दिलेल्या
सुचनाप्रमाणे व केलेल्या मार्गदर्शनावरून पाचगणी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. दिलीप पवार
सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री. बालाजी सोनुने पोलीस उप निरीक्षक व तपासी अंमलदार पो. हवालदार
श्रीकांत कांबळे ब.क. १२८३, पो.ना.तानाजी शिंदे ब. क्र. ९६२, तसेच पोलीस हवालदार विनोद पवार
ब.क्र.६४४, पो.काँ. उमेश लोखंडे ब.क्र.७६२, पो.काँ. अमोल जगताप ब. क्र. ७०० यांनी गुन्हा उघडकीस
येण्याकरीता कसोशिने प्रयत्न करून हिरेजडीत अंगठीबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासाच्या
आत गुन्हयातील आरोपी माधव केशव लटपटे वय २० रा. कोदरी ता. गंगाखेड जि. परभणी यास अटक
करून त्याच्याकडुन गुन्हयात गेलेल्या दोन्ही हिरेजडीत अंगठया असा एकुण ७०,०००/- रू किंमतीचा
१०० टक्के माल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच मोटर सायकल चोरीबाबत आरोपी प्रितम
सुनिल शिंदे वय ३० रा. दामले आळी, गंगापुरी वाई ता. वाई जि. सातारा यास दि. १९.०९.२०२४ रोजी
त्यास विश्वासात घेवुन त्याच्याकडे विचारपुस करता त्याने गुन्हयाची कबुली दिलेली आहे. सदर
आरोपी याच्याकडुन वरील नमुद दोन्ही गुन्हयातील मोटर सायकल असा एकुण ९०,०००/- रूपयाचा
माल हस्तगत करण्यात आला आहे.
चालु वर्षी सन २०२४ मध्ये पाचगणी परिसरातुन गहाळ झालेले मोबाईलचा शोध
लागण्याकरीता विशेष प्रयत्न करून गहाळ झालेल्या मोबाईलपैकी ३५ मोबाईलचा शोध लावुन
संबंधीतांना त्यांचे मोबाईल देण्यात आले आहेत. सदर कारवाईमध्ये श्री. दिलीप पवार सहाय्यक पोलीस
निरीक्षक, श्री.बालाजी सोनुने पोलीस उप निरीक्षक व तपासी अंमलदार पोलीस हवालदार श्रीकांत
कांबळे ब.क्र.१२८३, पो.ना. तानाजी शिंदे ब. क्र. ९६२ तसेच पोलीस हवालदार विनोद पवार ब.क्र.६४४,
पो.काँ.उमेश लोखंडे ब.क्र.७६२, पो.काँ. अमोल जगताप ब.क्र. ७०० यांनी सहभाग घेतला असुन त्यांनी
केलेल्या चांगल्या कामगिरीबाबत त्यांचे मा. पोलीस अधीक्षक श्री. समिर शेख सो, यांनी अभिनंदन केले
आहे.
Post a Comment
0 Comments