सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
उंब्रज पोलिसांनी गहाळ झालेले ४लाख किंमतीचे २५ मोबाईल मुळ मालकांना परत केले.
( उंब्रज पोलीस स्टेशनची उत्कष्ट कामगिरी )
उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीतील गहाळ झालेले एकूण २५ मोबाईल ४ लाख
रुपये किंमतीचे शोध घेवून तक्रारदार यांना श्री. रविंद्र भोरे सहा. पोलीस
निरीक्षक उंब्रज यांचे हस्ते परत केले.
मा. पोलीस अधिक्षक साो, सातारा श्री. समीर शेख साहेब, मा. उपविभागीय पोलीस
अधिकारी साो, श्री. अमोल ठाकुर यांनी श्री. रविंद्र भोरे सहा. पोलीस निरीक्षक उंब्रज पोलीस स्टेशन
यांना उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीतील गहाळ मोबाईल तक्रारी बाबत गांभीयाने लक्ष देवून जास्तीत जास्त
मोबाईलचे शोध घेवून तक्रारदार यांना परत करणे बाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने श्री. रविंद्र
भोरे सहा. पोलीस निरीक्षक, यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो कॉ थोरात यांना योग्य ते मार्गदर्शन
केले. त्याप्रमाणे पो. कॉ. मयुर थोरात व इतर पोलीस अंमलदार यांनी सायवर पोलीस ठाण्याच्या
माध्यमातून तांत्रिक माहिती प्राप्त करुन त्यांचे तांत्रिक विश्लेषन करुन सदरचे गहाळ झालेले मोबाईलचे
तात्काळ शोध घेवून सातारा तसेच इतर जिल्ह्यातून २५ मोबाईलचा शोध घेवून गहाळ झालेले मोबाईल
तक्रारदार यांना परत केल्याने नागरिकांमध्ये पोलीस प्रशासना बाबत प्रशंसनीय भावना व्यक्त करण्यात
येत आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक सो, सातारा श्री. समीर शेख साहेब, मा.
उपविभागीय पोलीस अधिकारी साो, श्री. अमोल ठाकुर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस
निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर, पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, पो. हवा
संजय धुमाळ, पो. कॉ. मयुर थोरात, पो. कॉ राजकुमार कोळी, पो. कॉ. श्रीधर माने, पो. कॉ. हेमंत
पाटील, पो. कॉ. गणेश कुंदे, पो. कॉ. मधुकर मांडवे, पो. कॉ. प्रशांत पवार, पो. कॉ. निलेश पवार
तसेच सायबर सेलचे पो कॉ महेश पावर यांनी केली आहे.
Post a Comment
0 Comments