Type Here to Get Search Results !

सातारा जिल्ह्यातील मौजे श्रेत्रमाहुली येथील २ इसमांना सातारा पोलीसांनी २ वर्षाकरीता केले तडीपार.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

सातारा जिल्ह्यातील मौजे श्रेत्रमाहुली येथील २ इसमांना सातारा पोलीसांनी २ वर्षाकरीता केले तडीपार.



(सातारा जिल्हयातील सातारा शहर परिसरातील शरिराविरुध्दचे / मालमत्तेविरुध्दचे

सराईतपणे गुन्हे करणाऱ्या टोळीतील ०२ इसमांना सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार )

सातारा जिल्हयामध्ये सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख १) जयदिप

सचिन धनवडे, वय २२ वर्षे, २) हर्षद संभाजी साळुंखे, वय २२ वर्षे, दोन्ही रा. क्षेत्रमाहुली ता जि सातारा यांचे टोळीवर

सातारा शहर पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, चोरी करणे, खंडणी मागणे, दुखापत पोचवणे

वगैरेबाबत यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने सातारा शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. राजेंद्र मस्के, पोलीस

निरीक्षक सातारा शहर पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पुर्ण सातारा जिल्हा, पुणे

जिल्ह्यातील भोर, बारामती, पुरंदर तालुक्यातून, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, तालुक्यातून, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस

तालुक्यातून दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला

होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री. राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा भाग सातारा यांनी केली होती.

सदर टोळीतील इसमांचेवर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही

त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. या टोळीमधील इसम हे सातारा शहर तसेच परिसरामध्ये

सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे सातारा शहर परिसरातील लोकांना मोठया

प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.

वरील टोळीला मा.समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी होवुन सदर

टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पुर्ण सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्यातील भोर, बारामती, पुरंदर तालुक्यातून, सांगली

जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, तालुक्यातून, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला

आहे.

नोव्हेंबर २०२२ पासुन मपोकाक ५५ प्रमाणे ३० उपद्रवी टोळयांमधील ९६ इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे २८

इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ०३ इसमांना असे एकुण १२७ इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली असुन

एमपीडीए कायदयाअंतर्गत १ इसमावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असुन भविष्यातही सातारा जिल्हयामधील

सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.

या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा

सातारा,यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो. कॉ. केतन शिंदे,

म.पो.कॉ.अनुराधा सणस, सातारा शहर पोलीस ठाणेचे पोहवा दिपक इंगवले, संदीप पवार, पोकॉ अमोल सापते यांनी योग्य

पुरावा सादर केला आहे.

Post a Comment

0 Comments