Type Here to Get Search Results !

गणेश उत्सव व ईद ए मिलाद सणांच्या अनुषंगाने सातारा शहरामध्ये दंगा काबु योजनेचे प्रात्यक्षिक.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

गणेश उत्सव व ईद ए मिलाद सणांच्या अनुषंगाने सातारा शहरामध्ये दंगा काबु योजनेचे प्रात्यक्षिक.


दिनांक ३०.०८.२०२४ रोजी सायं १७:३० वा.ते १८:१५ वा.दरम्यान गणेश उत्सव २०२४ व ईद ए मिलाद सणाचे अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीतील राजवाडा गांधी मैदान येथे दंगा काबू योजना घेण्यात आले. 


            सदर दंगा काबू योजनेत पोलीस मुख्यालय कडी दोन आरसीपी प्लाटून, नगरपरिषद कडील अग्नीशमक वाहन, सिव्हिल हॉस्पिटल कडील ॲम्बुलन्स व पोलीस अधिकारी, अंमलदार हजर होते. सदर दंगा काबू योजने दरम्यान आर सी पी प्लाटून कडून दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यामध्ये दोन टीयर स्मोक अश्रू धुराचे नळकांडे फोडण्यात आले. तसेच सायं 18:00 वा ते 19:00 वा दरम्यान रूट मार्च घेण्यात आला सदरचा रूट मार्च हा शाहूपुरी पोलीस ठाणे चे हद्दीतील आगमन व विसर्जन मार्गावरून राजवाडा, गांधी मैदान, मोती चौक, सदाशिव पेठ, शनिवार पेठ ५०१ पाटी,देवी चौक, मारवाडी चौक, राजवाडा, गोल मारुती मंदिर, समर्थ मंदिर चौकापर्यंत घेण्यात आला.



 सदर रूट मार्च करिता शाहूपुरी, सातारा शहर, सातारा तालुका, बोरगाव पोलीस ठाणे कडील एकूण ०८ अधिकारी ४२  अंमलदार व पोलीस मुख्यालया कडील २ आर सी पी प्लाटून हजर होते.


Post a Comment

0 Comments