Type Here to Get Search Results !

घरफोडी चोरीचा गुन्हा उघड करुन ५३,०००/- रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिणे हस्तगत.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

घरफोडी चोरीचा गुन्हा उघड करुन ५३,०००/- रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिणे हस्तगत.


 ( स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई)

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी

सातारा जिल्हयातील मालमत्ता चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक

गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याअनुशंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे

शाखेकडील तपास पथके तयार करुन त्यांना मालमत्ता चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले.

दि.०८/०६/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय गोपनिय बातमीदारामार्फत

माहिती प्राप्त झाली की, एक इसम सातारा शहरातील करंजे नाका या ठिकाणी घरफोडी चोरीतील सोन्याचे दागिणे

विक्री करण्याकरीता येणार आहे, त्याप्रमाणे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांना तपास पथकासह प्राप्त

माहितीच्या ठिकाणी जावून नमुद इसमास ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. तपास पथकाने

सातारा शहरातील करंजेनाका म्हसवे रोड या परिसरामध्ये सापळा लावून ताब्यात घेतले त्याचे अंगझडती घेतली असता

त्याचे कब्जामध्ये ५३,००० /- रुपये किमतीची एक सोन्याची चेन, चांदीची चेन, पायातील चांदीचे पैजन मिळून आले.

त्याचे कब्जात मिळून आलेल्या सोन्या चांदीच्या दागिण्या बाबत त्याचेकडे विचारपूस केली असता त्याने सदरचे सोन्या

चांदीचे दागिणे कोरेगाव शहरातील श्रीनाथनगर मार्केट यार्डचे पाठीमागे असलेल्या एका घरातून चोरी केले असल्याचे

सांगीतल्याने कोरेगाव पोलीस ठाणे गु.र.नं. २४२ / २०२४ भादविक ४५४, ३८० हा घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस

आला आहे.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे

मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर

पाटील, पृथ्वीराज ताटे, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार विश्वनाथ

संकपाळ, अतिष घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने,

प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, अरुण पाटील, अमित माने, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, मोहन

पवार,

रोहित निकम, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, वैभव सावंत, मयुर देशमुख, प्रविण पवार,

शिवाजी गुरव, संभाजी साळूंखे यांनी सदरची कामगिरी केलेली आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments