Type Here to Get Search Results !

खुनाचा प्रयत्न केलेल्या गुन्हयातील फरारी आरोपीस सात वर्षानंतर अटक.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

खुनाचा प्रयत्न केलेल्या गुन्हयातील फरारी आरोपीस सात वर्षानंतर अटक.



पोलीस स्टेशन वडूज गु.र.नं. 211/2017 भादविस कलम 307,323,504,506,34 अन्वये दिनांक 09/06/2017 रोजी दाखल एकुण 4 आरोपीविरुध्द दाखल झाला होता. नमुद गुन्हयात या पुर्वी 3 आरोपीस अटक झाली होती. परंतु आरोपी नामे रुपाली  ऊर्फ भाग्यश्री शंकर भिंगारदिवे वय 36 वर्ष रा. मायणी ही मिळुन येत नव्हती. 

      दि.08/06/2024 रोजी सकाळी पोलीस स्टेशन वडुज येथील महिला पोलीस अंमलदार प्रतिभा केशव कदम यांना गोपनीय महिती मिळाली की, नमुद महिला वेगळया नावाने काडगाव ता.विटा येथे राहत आहे. प्राप्त गोपनीय बातमीची खातरजमा करुन लगेचच त्याच दिवशी सकाळी पो.स्टे.वडुज येथील तपास पथकाने रुपाली उर्फ भाग्यश्री शंकर भिंगारदिवे यांना अटक करुन मा.न्यायालयासमक्ष हजर केले आहे.   

       सदरची कामगिरी मा.समीर शेख सर,पोलीस अधीक्षक,सातारा, मा.आँचल दलाल मॅडम, अपर पोलीस अधीक्षक,सातारा श्रीमती अश्विनी शेंडगे, उप विभागीय पोलीस  अधिकारी दहिवडी कॅम्प वडूज घनश्याम सोनवणे, पोलीस निरीक्षक वडूज यांचे मार्गदर्शणात पोहवा प्रतिभा कदम, पोहवा प्रविण सानप,अमोल चव्हाण,पो.कॉ. अजय काळेल,द-याबा नरळे, कुंडलीक कटरे, मकसुद शिकलगार, सत्यावान खाडे, मपोशि विद्या जाधव, मपोशि मेघा शिंदे, चालक किरण चव्हाण यांनी केली असुन पुढील तपास श्री अमीत शिंदे पोलीस उप निरीक्षक करीत आहेत.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments