Type Here to Get Search Results !

पत्नीच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त सुवासिनींना 224 फळ झाडे वाटप करून अनोखी श्रध्दांजली.!

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/दादा जाधव 

पत्नीच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त सुवासिनींना 224 फळ झाडे वाटप करून अनोखी श्रध्दांजली.!


               आपल्या आरोग्य सेविका पत्नीच्या अकाली निधनानंतर खचून न जाता खंबीरपणे उभे राहून आपल्या सामाजिक व आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणारे धन्वंतरी जनकल्याण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विशाल नाळे यांचे समाजातील सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.

    पत्नीच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त 5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 6 जून रोजी साखरवाडी येथे झालेल्या पुण्यस्मरण कार्यक्रमात पत्नी मनीषा चां स्मरणार्थ एकूण 224 ( 210 तैवान पिंक पेरू व 14 तुळशीच्या रोपांचे) उपस्थित सर्व सुवासिनींना झाडे व ओटी भरण करून पुण्यस्मरण कार्यक्रम संस्मरणीय करून शासनाच्या वृक्ष संवर्धन अभियानाला एक प्रकारे नव संजीवनी देवून समाजात आदर्शवत संदेश दिला या प्रसंगी श्री स्वामी समर्थ मठ साखरवाडी येथील स्वामी सेवकांनी नाम जप तसेच भजन सेवा दिली तसेच गुरुवर्य रामदास जगताप गुरुजी यांनी सुश्राव्य अशी कीर्तन सेवा दिली.

या प्रसंगी विशाल नाळे यांचा मित्र परिवार शिक्षण,आरोग्य,सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्वांचे नाळे कुटुंबीय व पाहुणे मंडळींनी आभार मानले.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments