सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
रावडी बुद्रुक येथील व पंचक्रोशीतील नागरिक बिबट्याच्या भीतीने हैराण.
रावडी बुद्रुक ता.फलटण जि.सातारा येथे काल संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एका मेंढपाळाने दोन मेंढ्या त्याच्यासमोर बिबट्याने पळवलेल्या आहेत असे स्वतःने सांगितले व वनक्षेत्रपाल यांना माहिती देऊन त्यांना प्रत्यक्षदर्शी भेट देण्यास त्यांनी बोलावले असता स्वतः वनपाल राजेश आवारे यांनी स्वतः भेट देऊन या गोष्टीची संपूर्ण माहिती घेऊन शहानिशा करण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बिबट्याचे पुरावे नसल्याचे त्यांनी सांगितले आहे कदाचित अशीही शंका वर्तवली जात आहे की तो बिबट्या आहे की नाही हे समजू शकले नाही परंतु कदाचित तो बिबट्या नसून तरस ही असू शकतो त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून भयभीत न होता जर संशयास्पद जर काही गोष्टी निदर्शनास आल्यास त्यांनी तात्काळ वनपाल यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केलेले आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121
Post a Comment
0 Comments