Type Here to Get Search Results !

उल्लेखनीय कामगिरी बद्दल पोलीस उपनिरीक्षक संभाजी बनसोडे यांना राष्ट्रपतीपदक.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

उल्लेखनीय कामगिरी बद्दल पोलीस उपनिरीक्षक संभाजी बनसोडे यांना राष्ट्रपतीपदक.


 पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा येथील जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असणारे संभाजी सुदाम बनसोडे, श्रेणी

पोलीस उपनिरीक्षक यांना त्यांचे ३० वर्षाचे गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल दिनांक ६ जून २०२४ रोजी मा. राज्यपाल, महाराष्ट्र

राज्य मुंबई यांचे हस्ते राष्ट्रपतीपदक अलंकरण करण्यात आले.

संभाजी सुदाम बनसोडे हे सातारा जिल्हा पोलीस दलात सन १९९० साली पोलीस शिपाई या पदावर भरती होवून

ते सध्या श्रेणी पोलीस उपनिरीक्षक या पदावर जिल्हा विशेष शाखा येथे कर्यरत आहेत. त्यांनी पोलीस मुख्यालय सातारा,

जिल्हा विशेष शाखा, पांचगणी पोलीस ठाणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा इत्यादी ठिकाणी उत्कृष्ठ सेवा

वजाविली आहे. पोलीस दलात काम करताना त्यांनी जिल्हा विशेष शाखा व लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील त्यांचे

काम उल्लेखनीय राहिले आहे. आज पर्यंतच्या सेवाकालावधीत वेळोवेळी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीकरीता त्यांना

३८० बक्षिसे मिळालेली आहेत. या त्यांच्या उल्लेखनीय कामकाजाबाबत त्यांना सन २०१६ मध्ये पोलीस

महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे पोलीस पदक प्राप्त झालेले असून आज पर्यंतत्यांनी ३४ वर्षे उल्लेखनीय

केलेल्य सेवे वद्दल सन २०२२ मध्ये मा. राष्ट्रपती, भारत सरकारनवीदिल्ली यांचेकडून गुणवत्तापुर्ण सेवेचे पोलीस

पदक पुरस्कृत केले असून सदर पदक अलंकरण सभारंभ मा. राज्यपाल महोदय महाराष्ट्र शासन, यांचे हस्ते

दिनांक ६ जून २०२४ रोजीदरबार हॉल राजभवन, मुंबई येथे संपन्न झाला. त्याबाबत मा. श्री. समीर शेख, पोलीस

अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, श्री. सबनीस पोलीस उप अधीक्षक,

मुख्यालय सातारा यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments