Type Here to Get Search Results !

लोणंद पोलीसांनी सामाजिक बांधिलकी जपत मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईदच्या शुभेच्छा...!

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

लोणंद पोलीसांनी सामाजिक बांधिलकी जपत मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईदच्या शुभेच्छा...!


नेहमीच नागरिकांच्या प्रत्येक सणांमध्ये नागरिकांना सुरक्षित संरक्षण देण्याबरोबरच एक आदर्श पूर्वक सामाजिक बांधिलकी जपण्याचे लोणंद पोलिसांनी कर्तव्य पार पाडले आहे.कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने लोणंद पोलीस ठाणे हे नेहमीच कर्तव्यदक्ष ठरले आहे त्याचप्रमाणे

दि. १७/६/२०२४ रोजी मुस्लिम बांधवांचे बकरी ईद सणाच्या अनुषंगाने लोणंद पोलीस ठाणे हद्दीत इंदिरानगर लोणंद येथील ईदगाह मैदान या ठिकाणी ०८:०५ ते ०८:३५ या वेळेत नमाज पठण करण्यात आले नमाज पटनकरिता ६०० ते ७०० मुस्लिम बांधव उपस्थित होते तसेच हद्दीतील सहा मस्जिद ठिकाणी ०८:०० ते ०९:१५ या वेळेत नमाज पठण करण्यात आले सर्व मज्जिद ठिकाणी ५० ते ६० जनसमुदाय उपस्थित होता तसेच बकरी ईद अनुषंगाने योग्य तो पोलिस बंदोबस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आला होता.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121


Post a Comment

0 Comments