सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
सातारा जिल्ह्यामध्ये २३५ पोलीस कॉन्स्टेबल पदांची महाभरती.,.
पोलीस भरती २०२२-२३
सन २०२२ - २३ मधील सातारा जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर रिक्त पदांची भरती आयोजित
करण्यात आलेली असुन पोलीस कॉन्स्टेबल पदांची २३५ रिक्तपदे भरण्यात येणार आहेत त्याचे विवरण
खालीलप्रमाणे आहे.
अ.क्र. पदाचे नाव
पोलीस कॉन्स्टेबल + बॅन्डस्मन पोलीस कॉन्स्टेबल
चालक पोलीस कॉन्स्टेबल
एकुण
१९६
३९
२३५
पोलीस भरती दिनांक १९/०६/२०२४ रोजीपासुन सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक
सातारा यांनी त्यांचे दालनामध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये पोलीस भरतीमध्ये सहभागी होणारे उमेदवार
यांना सुचना व आवाहन करण्यात आलेले आहे.
पोलीस भरती करीता येणाऱ्या उमेदवारांनी आवेदन अर्ज भरताना सादर केलेल्या कागदपत्रांचे दोन
छायांकित संच व नजीकच्या काळातील पासपोर्ट साईज ६ फोटो सोबत ठेवावेत. उमेदवारांची दिनांक
१९/०६/२०२४ पासुन मैदानी चाचणी परिक्षा सुरु होणार आहे. याकरीता उमेदवारांनी हजेरी माळ ग्राउंड
सातारा येथे सकाळी ०५.०० वाजता आवेदन पत्रासह हजर राहण्याचे आहे. सदर पोलीस भरती ही दिनांक
१९/०६/२०२४ ते दिनांक २६/०६/२०२४ पर्यत चालणार आहे. भरती करीता येणारे काही उमेदवार हे बाहेर
जिल्हयातील तसेच सातारा जिल्हयातील अत्यंत गरीब कुटुंबातुन येत असतात त्यांची राहण्याची सोय नसते
अशा गरीब कुटुंबातील फक्त उमेदवारांकरीता मैदानी चाचणीचे आदल्या दिवशी राहण्याची सोय पोलीस
करमणुक केंद्र (अलंकार हॉल) सातारा तसेच शाहु स्टेडीयम, एसटी स्टॅन्ड शेजारी, सातारा येथे करण्यात
येणार आहे. काही उमेदवारांना वेगवेगळया पदाकरीता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणी एकाच दिवशी मैदानी
चाचणी करीता हजर राहण्याची सुचना प्राप्त झाली असेल अशा उमेदवारांना दुसरी तारीख देण्यात येईल.
मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना प्राप्त गुण हे त्याच दिवशी त्यांचे समक्ष सांगितले जाणार आहेत तसेच सदरचे
गुण ऑनलाईन प्रसारीत केले जाणार आहेत.
तसेच जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होवु शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य
तारीख दिली जाईल. काही उमेदवारांना काही अडचणी असल्यास त्यांचे निरसण स्थानिक पातळीवर करण्यात
येईल. पोलीस भरतीच्या उमेदवारांच्या शंकांचे निरसण करण्याकरीता ०२१६२-२३११८१ या संपर्क क्रमांकावर
संपर्क साधण्याचा आहे सदर क्रमांकावार उमेदवारांना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल.
पोलीस भरती करीता जवळजवळ १३,०३० उमेदवारांची आवेदनपत्र प्राप्त झाली असुन सातारा जिल्हा
पोलीस दलाने भरती प्रक्रियेसाठी आवश्यक तो बंदोबस्त नेमलेला असुन उमेदवारांसाठी आवश्यक त्या
उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
तसेच उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, सातारा जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही
प्रकारच्या भुलथापांना व अमिषाला बळी पडु नये असा प्रकार निदर्शनास आल्यास उमेदवारांनी तात्काळ
०२१६२-२३११८१ या नंबरवर तक्रार करण्याची आहे. मैदानावरील उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांशी
संपर्क साधावा.
पोलीस भरती २०२२ - २३ ची पदसंख्या व भरतीबाबतचे निकषाची जाहीरात दिनांक ०१/०३/२०२४ रोजी
सातारा पोलीस दलाचे वेबसाईटवर प्रसारीत करण्यात आलेली आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121
Post a Comment
0 Comments