Type Here to Get Search Results !

साखरवाडी विद्यालयात नवागतांचे उत्साहात जल्लोषी स्वागत !

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/ वैभव जगताप 

साखरवाडी विद्यालयात नवागतांचे उत्साहात जल्लोषी स्वागत ! 


                              आज १५ जून २०२४ रोजी नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ झाला.यानिमित्ताने साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्वच नवागत विद्यार्थ्यांचे अत्यंत उत्साहात जल्लोषी स्वागत करण्यात आले.साखरवाडी ग्रामपंचायत सरपंच सौ रेखाताई जाधव आणि उपसरपंच श्री अक्षय रुपणवर यांचे शुभहस्ते गुलाबपुष्प देवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.संपूर्ण शालेय परिसर सुशोभित करण्यात आला होता.सनईच्या मंजुळ सुरांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले होते.त्यामुळे सर्व विद्यार्थी सुद्धा भारावून गेले होते.पहिल्याच दिवशी महाराष्ट्र शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेनुसार इयत्ता ५ वी ते ८ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिलाताई जगदाळे यांनी शालेय प्रगतीचा आढावा सादर करून सर्वांचे स्वागत केले.पर्यवेक्षक श्री तुळशीदास बागडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यालयातील सर्व शिक्षक - शिक्षकेतर बंधू भगिनी , विद्यार्थी,पालक या कार्यक्रमास उपस्थित होते.उपस्थित पालकांनाही याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक श्री हरिदास सावंत यांनी केले.विद्यालयाच्या चौफर प्रगतीमुळे या वर्षी प्रशालेत उच्चांकी संख्येने विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत.यामुळे पालकांनीही प्रशाला, संस्था पदाधिकारी  विश्वस्त समिती अध्यक्ष माननीय श्री प्रल्हाद रावजी साळुंखे पाटील , संस्था अध्यक्ष माननीय श्री   धनंजयदादा साळुंखे पाटील , संस्थेचे संचालक माननीय श्री राजेंद्र शेवाळे ,  ,श्री राजेंद्र भोसले , श्री कौशल भोसले मुख्याध्यापिका  सौ जगदाळे ,  पर्यवेक्षक श्री बागडे व सर्व शिक्षक - शिक्षकेतर वर्गाचे विशेष अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments