Type Here to Get Search Results !

फलटणच्या पूर्व भागात ढगफुटीसदृश्य पाऊस

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

फलटणच्या पूर्व भागात ढगफुटीसदृश्य पाऊस. 


(फलटण-दुधेबावी-परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस.फलटण-दहीवडी, फलटण-शिंगणापुर वाहतूक पूर्वपदावर चालू करण्याचे प्रशासनाचे रात्री उशिरापर्यंत काम युद्धपातळीवर चालू)







दि. १७/६/२०२४ रोजी संध्या ५:०० सुमारास फलटण तालुक्यातील दुधेबावी परिसरामध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने ओढ्या नाल्यांना पूर आलेला आहे काही ठिकाणी रस्ते खचले गेले आहेत तरी त्या ठिकाणी काहीही धोक्याचे प्रकार घडु नयेत म्हणून ते पूर्ववत करण्याचे काम युद्ध पातळीवर स्थानिक गावकऱ्यांच्या व फलटण ग्रामीण पोलीस प्रशासन वतीने करण्यात आले त्यामुळे फलटण-दहिवडी,फलटण- शिंगणापूर रस्ते बंद झाले असून मिरढे या ठिकाणी रस्ता खचला असुन ओढया नाल्याच्या पुराचे पाणी ओसरत नाही तो पर्यंत वाहतुकीसाठी पर्यायी  मार्गाचा वापर करावा असे पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आले.




याचवेळी पुराच्या पाण्यात एका व्यक्तीला वाहून जाताना स्थानिक ग्रामस्थांच्या व फलटण ग्रामीण पोलीस  पोलिसांच्या मदतीने त्या व्यक्तीस वाचवले.यावेळी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी त्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहुन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments