Type Here to Get Search Results !

*पैलवान घडवणारा पैलवान हरपला पै. खाशाबा करचे यांचे निधन कुस्ती क्षेत्रावर दुःखाचा डोंगर* प्रतिनिधी तानाजी सोडमिसे सोमंथळी ता. फलटण कुस्तीला ऊर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे प्रसिद्ध पैलवान क्रीडा शिक्षण, कुस्ती पंच, वस्ताद अशा अनेक नावांनी प्रसिद्ध असलेले पै.खाशाबा करचे वय 55 यांचे ३ जुन २०२४ सोमवारी दुःखद निधन झाले त्यांच्या जाण्याने सोमंथळी मधील कुस्तीगीर हळहळ व्यक्त करीत आहेत. ग्रामीण भागात कुस्तीचा प्रसार करून पैलवान तयार करण्यासाठी तेच सातत्याने प्रयत्न करत होते. हृदयविकाराच्या झटक्याने संध्याकाळी दहा वाजून 30 मिनिटाच्या सुमारास खाशाबा करचे यांचं आकस्मिक निधन झाले कुस्ती, क्रीडा सहकार राजकीय सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील एक उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक व प्रशिक्षक तसेच सोमंथळी गावाचे नाव ही बापूंनी कुस्ती क्षेत्रांत राज्यभरात उंचवण्याचे त्यांचे योगदान मोलाचे होते. नावातच खाशाबा असल्यामुळे ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या प्रमाणेच कुस्ती क्षेत्राची आवड व स्वतः लाल मातीत खेळले अनेक मैदाने ही गाजवली मुलगा गणेश यांनी यांच्या रूपाने घरात कुस्तीची परंपरा चालू ठेवली काही वर्षांपूर्वी सोमंथळी मध्ये हळूहळू कुस्ती खेळणाऱ्यांची संख्या कमी कमी होत गेली सोमंथळी खरंतर पैलवानांचे गाव म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध. परंतु गावात पैलवानांची संख्या कमी असल्याचे पाहून बापू अस्वस्थ होत होते. मग त्यांनी काही मुलांना बोलवून कुस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली बापू वाजता झाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती शिकण्यासाठी हळूहळू गावातील मुलांची संख्या वाढली गावातीलच नाहीतर आजूबाजूच्या पंचक्रोशीतील मुलेही बापूंकडे कुस्तीचे धडे देऊ लागले. महाराष्ट्रातील नामांकित असलेले महाराष्ट्र केसरी स्पर्धा तसेच अनेक राज्य व राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट अशे पैलवान तयार करण्यात आले होते. सोमंथळी क्रीडा संकुल येथील ग्रामीण भागातील मुलांना त्याचबरोबर मुलींना मोफत कुस्तीचे प्रशिक्षण ते देत होते. त्यांच्या या कार्यामुळे अनेक मुले मुली राष्ट्रीय, महाराष्ट्र चॅम्पियन, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चमकले आहेत. कुस्ती क्षेत्रातील व क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने त्यांना गौरविण्यात आले होते. सोमंथळी गावातील ग्रामदैवताच्या हनुमान उत्सवानिमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या कुस्ती आखाड्याचे नियोजनामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी सातत्याने लाल मातीची सेवा केली सेवेमुळे त्यांच्या जाण्याने कुस्तीगीर हळहळ व्यक्त करीत आहेत. त्यांच्या पश्चात त त्यांची पत्नी व मुलगा असा परिवार आहे कै.खाशाबा गोपाळा करचे यांचा सावडने व दशक्रिया विधी बुधवार दिनांक ५जून २०२४ रोजी सकाळी ७ वाजता करण्याचे योजिले आहे.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

सोमंथळी/तानाजी सोडमीसे 

पैलवान घडवणारा पैलवान हरपला पै. खाशाबा करचे यांचे निधन कुस्ती क्षेत्रावर दुःखाचा डोंगर.


 

सोमंथळी ता. फलटण कुस्तीला ऊर्जितावस्था  प्राप्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे प्रसिद्ध पैलवान क्रीडा शिक्षण,  कुस्ती पंच, वस्ताद अशा अनेक नावांनी प्रसिद्ध असलेले पै.खाशाबा करचे वय ५५ वर्ष यांचे ३ जुन २०२४ सोमवारी दुःखद निधन झाले त्यांच्या जाण्याने सोमंथळी मधील कुस्तीगीर हळहळ व्यक्त करीत आहेत. ग्रामीण भागात कुस्तीचा प्रसार करून पैलवान तयार करण्यासाठी तेच सातत्याने प्रयत्न करत होते. 

हृदयविकाराच्या झटक्याने संध्याकाळी १० वाजून ३० मिनिटाच्या सुमारास खाशाबा करचे यांचं आकस्मिक निधन झाले कुस्ती, क्रीडा सहकार राजकीय सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील एक उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक व प्रशिक्षक तसेच सोमंथळी गावाचे नाव ही बापूंनी कुस्ती क्षेत्रांत राज्यभरात उंचवण्याचे त्यांचे योगदान मोलाचे होते. नावातच खाशाबा असल्यामुळे ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या प्रमाणेच कुस्ती क्षेत्राची आवड व स्वतः लाल मातीत खेळले अनेक मैदाने ही गाजवली मुलगा गणेश यांनी यांच्या रूपाने घरात कुस्तीची परंपरा चालू ठेवली काही वर्षांपूर्वी सोमंथळी मध्ये  हळूहळू कुस्ती खेळणाऱ्यांची संख्या कमी कमी होत गेली सोमंथळी खरंतर पैलवानांचे गाव म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध. परंतु गावात पैलवानांची संख्या कमी असल्याचे पाहून बापू अस्वस्थ होत. मग त्यांनी काही मुलांना बोलवून कुस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली बापूंच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती शिकण्यासाठी हळूहळू गावातील मुलांची संख्या वाढली गावातीलच नाहीतर आजूबाजूच्या पंचक्रोशीतील मुलेही बापूंकडे कुस्तीचे धडे देऊ लागले. महाराष्ट्रातील नामांकित असलेले महाराष्ट्र केसरी स्पर्धा तसेच अनेक राज्य व राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट असे पैलवान तयार करण्यात आले होते. 

सोमंथळी क्रीडा संकुल येथील ग्रामीण भागातील मुलांना त्याचबरोबर मुलींना मोफत कुस्तीचे प्रशिक्षण ते देत होते. त्यांच्या या कार्यामुळे अनेक मुले मुली राष्ट्रीय, महाराष्ट्र चॅम्पियन, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चमकले आहेत. कुस्ती क्षेत्रातील व क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने त्यांना गौरविण्यात आले होते. सोमंथळी गावातील ग्रामदैवताच्या हनुमान उत्सवानिमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या कुस्ती आखाड्याचे नियोजनामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी सातत्याने लाल मातीची सेवा केली सेवेमुळे त्यांच्या जाण्याने कुस्तीगीर हळहळ व्यक्त करीत आहेत. त्यांच्या पश्चात त त्यांची पत्नी व मुलगा असा परिवार आहे

कै.खाशाबा गोपाळा करचे यांचा सावडने व दशक्रिया विधी बुधवार दिनांक ५जून २०२४ रोजी सकाळी ७ वाजता करण्याचे योजिले  आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments