सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
सातारा पोलीसांनी कराड मधील २ जणांच्या टोळीला केले २वर्षाकरिता तडीपार.
सातारा जिल्हयातील कराड शहर हद्दीतील शरिराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या ०२
जणांच्या टोळीला सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार
सातारा जिल्हयामध्ये कराड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख १) प्रशांत ऊर्फ
परशुराम रमेश करवले, वय २३ वर्षे, रा. कृष्णा घाट, सोमवार पेठ, कराड ता कराड जि सातारा २) निशीकांत निवास
शिंदे, वय २१ वर्षे, रा रेठरेकर कॉलनी, कराड ता.कराड जि.सातारा यांचे टोळीवर कराड शहर पोलीस ठाणे येथे दरोडा
टाकणे, दरोडयाची तयारी करुन बेकायदा अग्निशस्त्रे बाळगणे, जबरी करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, गर्दी
मारामारी करणेबाबतचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने कराड शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. के. एन. पाटील, पोलीस
निरीक्षक, कराड शहर पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पुर्ण सातारा
जिल्हयातुन तसेच सांगली जिल्हयातील शिराळा, वाळवा, कडेगाव, आटपाडी तालुक्यातुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा
प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री. अमोल
ठाकुर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग यांनी केली होती.
सदर टोळीतील इसमांचेवर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही
त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. ते कराड शहर परिसरात सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेवर
कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे कराड शहर तसेच आसपासच्या परिसरातील लोकांना मोठया प्रमाणावर या
टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.
वरील टोळीस मा.समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी होवुन त्यांनी
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पुर्ण सातारा जिल्हयातुन तसेच सांगली जिल्हयातील शिराळा, वाळवा,
कडेगाव,आटपाडी तालुक्याचे हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
नोव्हेंबर २०२२ पासुन मपोकाक ५५ प्रमाणे २६ उपद्रवी टोळयांमधील ८३ इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे २८
इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ०३ इसमांना असे एकुण ११४ इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली
असुन भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक
कारवाया करणेत येणार आहेत.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा
यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, श्रेणी पोउनि
तानाजी माने पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो. कॉ. केतन शिंदे, म.पो. कॉ. अनुराधा सणस, कराड शहर पोलीस
ठाणेचे सफौ संजय देवकुळे, पोकॉ आनंदा जाधव, मपोकॉ सोनाली पिसाळ यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121
Post a Comment
0 Comments