Type Here to Get Search Results !

शहीद वीर जवान वैभव भोईटे यांच्या कुटुंबीयांच्या शिक्षणाची जबाबदारी श्रीमंत रामराजे यांनी स्वीकारली



 


प्रतिनिधी फलटण 

दादा जाधव 


शहिद वीर जवान वैभव संपतराव भोईटे मु.पो. राजळे ता. फलटण देशाच्या संरक्षणाचे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले आहेत.  त्यामुळे त्यांचे कुटुंबाची खूप मोठी हानी झाली आहे. यामुळे त्यांचे कुटुंब पोरके झाले आहे. तरी या सर्व घटनेची आम्हाला जाणीव आहे, आपल्या कुटुंबातील शहिद वीर जवान वैभव यांची मुलगी कु.हिंदवी हिच्या भविष्यातील शिक्षणाचा सर्व खर्च आम्ही 'फलटण एज्युकेशन सोसायटीच्या' माध्यमातून करणार असल्याचे  महाराष्ट्र विधान परिषदेचे मा.सभापती श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांच्या सहीचे पत्र आज फलटण तालुका पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी राजाळे येथे जाऊन शहीद वीर जवान वैभव भोईटे यांच्या कुटुंबीयांना दिले आहे.

याप्रसंगी महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अक्षय गायकवाड, पै.अभिजीत जानकर, सागर निंबाळकर, निखिल निंबाळकर इत्यादी मान्यंवर याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी श्रीमंत विश्वजीतराजे यांनी सांगितले की शहीद वीर जवान वैभव भोईटे यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे आम्ही राजे कुटुंब उभा राहणार आहोत, पूर्वीपासून या घराण्याचा व आमचे संबंध घनिष्ठ राहिलेले आहेत. त्यामुळे भविष्यात काहीही अडचण आली तरी तुमच्यासाठी आमचा बंगल्याचे दरवाजे सदैव उघडे आहेत,  तुमची साथ आम्ही खंबीरपणे देणार असून कोणतीही काळजी करण्याचे कारण नसल्याचे ही श्रीमंत विश्वजितराजे(बाळराजे) यांनी यावेळी कुटुंबीयाशी बोलताना सांगितले

Post a Comment

0 Comments