Type Here to Get Search Results !

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने फलटण शहरात २० कोटी रुपयांची कामे मंजूर


 श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने फलटण शहरात २० कोटी रुपयांची कामे मंजूर 


 प्रतिनिधी 

दादा जाधव 


                विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने फलटण शहरातील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाकङून २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती जिल्हापरिषदेचे  माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे   नाईक निंबाळकर यांनी दिली . प्रभाग क्रमांक १० मधील १७ कामे या वैशिष्ट्यपूर्ण निधी मध्ये मंजूर झाली असून प्रभाग क्रमांक १० च्या नागरिकांच्या वतीने श्रीमंत रामराजे , श्रीमंत संजीवराजे , श्रीमंत रघूनाथराजे , आमदार दिपकराव चव्हाण यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.                                   लक्ष्मीविलास पॕलेस या त्यांच्या  निवासस्थानी झालेल्या पञकार परिषदेत श्रीमंत संजीवराजे  बोलत होते .यावेळी विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्दमान आमदार दीपकराव चव्हाण , श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष पांङूरंग गुंजवटे  यांची  उपस्थिती होती .                                                  पुढे बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की ,  महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकङून वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत  फलटण नगरपरिषदेस २० कोटी रुपयांच्या   निधी आणि कामे  मंजूर करण्यात आली  आहेत. विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी अजित दादा पवार यांनी हा निधी आणि कामे  मंजूर केलेली  असून फलटण शहरातील एकूण ७८ महत्त्वपूर्ण कामे या निधी मुळे मार्गी लागणार आहेत. तर 

 प्रभाग क्रमांक १० मधील १७ कामे या वैशिष्ट्यपूर्ण निधी मध्ये मंजूर झाली असून यामध्ये कैकाङवाङा आणि काळोखेवस्ती हनुमाननगर  येथील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन , किरण काटकर बोळात गटार सिमेंट पाईप , चेंबर आणि सिमेंट कॉंक्रिटिकरण , निलेश चिंचकर बोळात , हेमंत चिंचकर घराच्या समोर  आणि राजू पवार घराच्या शेजारी सिमेंट कॉंक्रिटिकरण करणे , उपाध्ये बोळात सिमेंट कॉंक्रिटिकरण करणे , अहिंसा मैदान लगतचा रस्ता सिमेंट कॉंक्रिटिकरण करणे , बारस्कर गल्ली सार्वजनिक शौचालयाजवळ सिमेंट कॉंक्रिटिकरण करणे , मंगलताई मठासमोर सिमेंट कॉंक्रिटिकरण करणे , ङॉक्टर राजवैद्द ते बाजारे घरासमोर सिमेंट कॉंक्रिटिकरण करणे , सम्राट जनरल शेजारी सिमेंट कॉंक्रिटिकरण करणे , बाळासाहेब सुतार पानपट्टी ते गणपती मंदिराच्या समोर सिमेंट पाईपलाईन करणे , कैकाङवाङा येथे दिलिप पवार घर ते नाथाच्या मंदिरा पर्यंत सिमेंट कॉंक्रिटिकरण करणे , संत बापूदासनगर येथे स्वागत कमान करणे , हनुमाननगर येथील स्वागत कमानी च्या शेजारी संरक्षक भिंत बांधणे , बुधवार पेठ हनुमान मंदिराच्या लगतचा वाफरात नसलेला  हौद पाङून संरक्षक भिंत बांधणे , फलटण ते सातारा रस्त्यावर बाणगंगा पुलाच्या जवळ स्वागत कमान उभारणे आदी कामांचा समावेश आहे.प्रभाग क्रमांक १० च्या नागरिकांच्या वतीने श्रीमंत रामराजे , श्रीमंत संजीवराजे , श्रीमंत रघूनाथराजे , आमदार दिपकराव चव्हाण यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments