Type Here to Get Search Results !

फलटण येथे कृषी पायाभूत सुविधा निधी योजना AIF कार्यशाळा व सामाईक पायाभूत सुविधा CIF कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न .

 फलटण येथे कृषी पायाभूत सुविधा निधी योजना AIF कार्यशाळा व सामाईक पायाभूत सुविधा CIF कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.

वैभव जगताप /फलटण 




           महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय फलटण व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजने अंतर्गत फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आत्मनिर्भर भारत अभियानातर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी योजना  व सामाईक पायाभूत सुविधा  च्या कार्यक्षम अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय कृतिसंगम कार्यशाळा शुक्रवार दि.२५.०८.२०२३ रोजी तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांच्या अध्यक्षतेखाली दरबार हॉल प्रांत कार्यालय फलटण येथे पार पडला 

          या कार्यशाळे मध्ये या योजने अंतर्गत रु.2 कोटी मर्यादेपर्यंत सर्व AIF कर्जावर वार्षिक 3 टक्के व्याज सूट असेल, सदर सवलत ही जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत उपलब्ध आहे पात्र कर्जधारकांसाठी सूक्ष्म व लघु उद्योजक योजनेच्या पत हमी निधी ट्रस्ट अंतर्गत रु.2 कोटी पर्यंतच्या कर्जासाठी या वित्त पुरवठा सुविधेतून पत हमी संरक्षण उपलब्ध आहे अशी माहीती  राजेंद्र गोर्डे अर्थशास्त्रज्ञ तथा वित्त प्रवेश सल्लागर, स्मार्ट सातारा यांनी दिली 

      तसेच फलटण तालुक्यातील सर्व बॅंक मॅनेजर HDFC BANK,IDBI BANK, MAHARASHTRA BANK यांनी बॅंक कर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे या बद्दल व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या बद्दल फिरोज शेख  नोडल अधिकारी स्मार्ट, सातारा व सुनिता सावंत District Resource Person यांनी माहिती दिली

           सदर कार्यशाळेस फलटण तालुक्यातील व पंचक्रोशीतील  शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व तसेच PMFME अंतर्गत सूक्ष्म व लघु कृषी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातम्या आणि जाहिरातीसाठी 

संपर्क :सह्याद्री निर्भिड न्युज 

संपादक:वैभव जगताप. मो-८००७८५२१२१

Post a Comment

0 Comments