सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया रजिस्ट्रेशन ची आज अंतिम मुदत..!
फलटण- शैक्षणिक वर्ष 2025- 26 मध्ये इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्य सरकारने ऑनलाईन सुरू केली असून इयत्ता अकरावीचे प्रवेशा अगोदर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. व आज त्याची अंतिम मुदत आहे .
अद्याप फलटण तालुका व परिसरातील विद्यार्थ्यांनी स्वतःचा ऑनलाईन प्रवेश व त्याचे रजिस्ट्रेशन केले नाही, त्यांनी तालुक्यातील मान्यताप्राप्त व सर्व सोयींनी युक्त अशा शाळांमध्येच आपला प्रवेश निश्चित करावा. इयत्ता दहावी नंतर अनेक विद्यार्थी हे आय टी आय किंवा डिप्लोमा सारख्या कोर्सला जातात परंतु आवडता ट्रेड व कोर्स न मिळाल्याने ते ना उमेद होतात. व त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची दाट शक्यता असते .म्हणून सर्वच विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावी प्रवेशाचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. जेणेकरून आपले वर्ष वाया जाणार नाही याची विद्यार्थी व पालक वर्गाने दक्षता घ्यावी. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे त्यांनी आपले रजिस्ट्रेशन ज्या प्रशालेमध्ये केलेले आहे. ते आजच पुन्हा तपासून घ्यावे. व खात्री करून घ्यावे असे मान्यता प्राप्त शाळांमधून सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सर्व पातळीवर खबरदारी घेण्यात येत आहे.
Post a Comment
0 Comments