Type Here to Get Search Results !

महाबळेश्वर -तापोळा रस्ता खचला.. बांधकाम विभागाची फक्त बघ्याची भूमिका..!

सह्याद्री निर्भिड न्यूज 

महाबळेश्वर/राहुल शेलार 

महाबळेश्वर -तापोळा रस्ता खचला.. बांधकाम विभागाची फक्त बघ्याची भूमिका..!


महाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे महाबळेश्वर तापोळा मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. तसेच विविध ठिकाणी मोऱ्याचे बांधकामही खचले आहे. यामुळे सातारा बांधकाम विभागावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. 






 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून महाबळेश्वर तापोळा परिसरात मोठ्या प्रमाणात रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. मात्र कामाची गुणवत्ता नसल्याने अनेक ठिकाणी रस्ते खचण्याचे व खड्डे पडण्याच्या घटना घडत आहेत. या निष्कृष्ट दर्जाच्या कामांमध्ये वाढ झाली आहे. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी. अन्यथा शिवसेना उ.बा.टा पक्षाच्या वतीने पुढील काळात आंदोलन करण्यात येईल असे निवेदन तालुकाध्यक्ष अभिषेक शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.

Post a Comment

0 Comments