Type Here to Get Search Results !

साखरवाडी-पिंपळवाडी येथील शिवारात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/ वैभव जगताप 

साखरवाडी-पिंपळवाडी येथील शिवारात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह.


साखरवाडी-पिंपळवाडी ता.फलटण येथील बालाजी पेट्रोल पंपाच्या पाठीमागील शिवारात सडलेल्या अवस्थेत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला असुन फलटण ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार व पो.हवालदार पिसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

फलटण तालुक्यातील अशाच प्रकारच्या घटना वाढत आहेत काही महिन्यांपूर्वी विडणी ता.फलटण येथील शिवारात अशाच प्रकारे सडलेल्या अवस्थेत अनोळखी महीलेचा मृतदेह आढळला होता.

खरंतर गृह विभागाने  पोलीस प्रशासनास अतिरिक्त नियंत्रणा देऊन तपास कामात काही सवलती पोलिसांना दिल्यास गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस निश्चित यशस्वी ठरतील परंतु गरज नसताना vip लोकांना अतिरिक्त बंदोबस्त पुरविण्यात पोलीस नियंत्रणा अक्षरशः मेटाकुटीला आली आहे.

Post a Comment

0 Comments