सह्याद्री निर्भिड न्यूज
संपादक -वैभव जगताप
साखरवाडी श्री. शारदोत्सव मधील महाआरती माननीय श्री. रणजितदादा ना. निंबाळकर यांचे शुभहस्ते संपन्न...!
श्री. भवानीमाता नवरात्र शारदोत्सव मंडळ ( श्री भवानी माता मंदिर - साखरवाडी बाजारपेठ) येथील चालू असलेल्या नवरात्र शारदोत्सवातील गुरुवारची महाआरती माढा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार माननीय श्री रणजित दादा नाईक निंबाळकर तसेच साखरवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री धनंजय दादा साळुंखे पाटील व इतर अनेक मान्यवरांचे शुभ हस्ते संपन्न झाली.याप्रसंगी साखरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माननीय श्री माणिक आप्पा भोसले , श्री विक्रम आप्पा भोसले तसेच मंडळाचे अध्यक्ष श्री दत्तात्रय शिवराम भोसले , कार्यवाह श्री हरिदास सावंत व सर्व सभासद कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments