सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
शासकिय गोदाम फोडणा-या टोळीच्या लोणंद पोलीसांनी आवळल्या मुसक्या.
लोणंद पोलीस ठाणे हददीतील कापडगाव ता. फलटण गावचे हद्दीतील शासकीय गोदामातील धान्य
चोरी झालेबाबत लोणंद पोलीस ठाणेत गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी
मा.पोलीस अधीक्षक साो सातारा समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक साो. वैशाली कडुकर मॅडम,
मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस सो, यांनी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हयाचे तपासात
वरीष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनावरुन लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री. सुशिल भोसले, सहाय्यक पोलीस
निरिक्षक व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी सदर घडलेल्या गुन्हयांबाबत गोपणीय खब-यांमार्फत
माहीती मिळवुन मिळाले माहीतीचे आधारे यातील आरोपी निष्पन्न केले.
दि.०५/१०/२०२४ रोजी यातील एक आरोपीचा ठावठिकाणा मिळताच मा. वरीष्ठ अधिकारी सो. यांचे
मार्गदर्शनाखाली श्री. सुशिल भोसले, सहायक पोलीस निरिक्षक व गुन्हे प्रकटीकरण पथकाने एक आरोपीस
ताब्यात घेतले. आरोपीकडे अधिक विचारपुस केली असता त्याने व त्याचे आणखी तीन साथीदारांनी मिळुन
शासकिय गोदामातील धान्याची १० पोती व वजने चोरी केलेची कबुली दिली. त्यावरुन त्याचे आणखी तीन
साथीदारांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचेकडुन चोरुन नेहलेला मुद्देमाल व गुन्हा करतेवेळी वापरलेल्या
दोन मोटर सायकली असा एकुण ८०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक सो सातारा समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक साो.
वैशाली कडुकर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी साो. राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस
स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशिल भोसले, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा. सर्जेराव सुळ, नाळे,
नलवडे (जिविशा बीट), विजय पिसाळ, नितीन भोसले, विठ्ठल काळे, केतन लाळगे, गोविंद आंधळे, अंकुश
कोळेकर, अभिजीत घनवट, संजय चव्हाण तसेच होमगार्ड सचिन निकम, रब्बानी शेख, हेमंत कारंडे, रवि
व्हटकर यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला असुन सदर गुन्ह्याचा तपास सपोफौ दिलीप येळे हे करीत
आहेत. मा. पोलीस अधिक्षक सो सातारा यांनी सर्व टिमचे अभिनंदन केले आहे.
Post a Comment
0 Comments