Type Here to Get Search Results !

सामाजिक कार्यकर्ते दिलीप(बाबा)पवार यांच्या कडून राष्ट्रीय पोषण कार्यक्रमावेळी लाडक्या बहिणींचे कौतुक

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/ प्रतिनिधी 

सामाजिक कार्यकर्ते दिलीप(बाबा)पवार यांच्या कडून राष्ट्रीय पोषण कार्यक्रमावेळी लाडक्या बहिणींचे कौतुक. 



         साखरवाडी ता.फलटण येथे गणपती मंडपात महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती फलटण एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राष्ट्रीय पोषण सोहळा अंगणवाडी बीट -साखरवाडी व निंभोरे यांच्या वतीने राबविण्यात आलेला कार्यक्रम पार पडला यावेळी अंगणवाडी सेविका व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता

        तृणधान्यापासून वेगवेगळे पदार्थ, पौष्टिक आहार,अंगणवाडी कडून राबविण्यात येणारे कार्यक्रम यांचे प्रात्यक्षिक मांडणीची दिलीप बाबा पवार यांनी पाहणी केली तसेच अंगणवाडी सेविका-मदतनीस यांनी लाडक्या बहिण योजनेचे साखरवाडी व निंभोरे अंगणवाडी सेविका यांनी सर्वात जास्त फाॅर्म भरले व ह्या योजनेचा फायदा लाडक्या बहिणींना करून दिला त्या बद्दल दोन्ही बीट च्या अंगणवाडी सेविका-मदतनीस,पर्यवेक्षिका व उपस्थित लाडक्या बहिणींचे दिलीप (बाबा)पवार यांनी विशेष कौतुक केले 

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भोसले सर यांनी केले तर दोन्ही अंगणवाडी बीट च्या वतीने सेविका सुरेखा वारे यांनी आभार मानले

Post a Comment

0 Comments