Type Here to Get Search Results !

पाटण पोलीस ठाणेची दमदार कारवाई

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

पाटण पोलीस ठाणेची दमदार कारवाई.


दि.०६/०९/२०२४ रोजी एक आयशर ट्रक चिपळूण ते कुंभारगाव ता. पाटण येथे अंडी विकून त्याचे

पैसे घेवून जात असताना ३ अज्ञात चोरट्यांनी कोयना ते पाटण रोडवरील हॉटेल चायपणी येथे सदरचा टेम्पो

आडवून यातील चालकावर चाकूने हल्ला करुन त्यास जखमी करुन टेम्पोमधील अंडीविक्रीचे मिळालेले रोख

१ लाख ८१ हजार ४१० /- रुपये व २ मोबाईल जबरीने चोरुन नेल्यावरुन इकडील पोलीस ठाण्यात गुन्हा

रजि. क्र. १५८/२०२४ भा. न्या. सं. कलम ३११, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

श्री. समीर शेख साो, पोलीस अधीक्षक, सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक सो, सातारा श्रीमती

वैशाली कडुकर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, पाटण श्री. विजय पाटील यांच्या सूचनेनुसार व

मार्गदर्शनाखाली पाटण पोलीस ठाणे कडील तपास पथक व स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथक यांच्य

पथकाने मिळालेल्या गोपनिय माहीती व तांत्रीक माहीतीच्या आधारे दि. ०६/०९/२०२४ कोयना - पाटण

रोडवर हॉटेल चायपानीजवळ एका आयशर टेम्पो अडवून त्यातील चालकावर चाकून हल्ला करुन त्यातील

रोख रक्कम व मोबाईल जबरीने चोरुन नेणारे ३ अज्ञात आरोपीस अटक करुन अतिशय गुंतागुंतीचा व

क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदर गुन्ह्यामध्ये पोलीसांनी कौशल्यपुर्ण तपास करीत व अज्ञात चोरट्याबाबत गोपनिय माहीती

मिळवत त्या गोपनिय माहीती व तांत्रीक माहीतीचे विश्लेषण करुन त्याआधारे दि. ०१/१०/२०२४ रोजी

कराड परिसरातून १. सुलतान अस्लम मुजावर वय २५ वर्षे रा. सोमवार पेठ कराड २. मोहम्मद मीर परवेज

वय २४ वर्षे रा. मुजावर कॉलनी कराड ३. अमन सलीम सयद वय २५ वर्षे रा. सोमवार पेठ कराड

ताब्यात घेण्यात यश मिळवलेले आहे. सदर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांचेकडुन गुन्ह्यात

वापरलेली मोटारसायकल, चाकु तसेच रोख रक्कम व चोरीस गेलेले २ मोबाईल फोन जप्त करण्यात

आलेली असुन पुढील तपास सपोनि संदिप कामत, पाटण पोलीस ठाणे हे करत आहेत.

सदरची कामगिरी श्री. समीर शेख साो, पोलीस अधीक्षक, सातारा, श्रीमती वैशाली कडूकर अपर

पोलीस अधीक्षक सो, सातारा, श्री. विजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, पाटण, श्री. अरुण

देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा श्री. अविनाश कवठेकर, पोलीस निरीक्षक, यांचे

मार्गदर्शनाखाली पाटण पोलीस ठाणे नेमणुकीचे श्री. सपोनि संदिप कामत, सपोनि प्रकाश भुजबळ, सपोनि

रोहित फार्णे, पोउनि राजेंद्र सदगर, पोहवा वैभव पुजारी, पोकॉ उमेश मोरे, श्रीकृष्ण कांबळे, केतन नाकाडे,

मपोकॉ वनिता पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोहवा शरद बेबेले, प्रविण फडतरे, अमित माने, गणेश

कापरे, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर

यांच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी केलेबद्दल पोलीस अधीक्षक सो, सातारा यांनी विशेष अभिनंदन केलेले

आहे.

Post a Comment

0 Comments