सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
सातारा जिल्हात गणेशोत्सव कालावधीत प्लाझा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईट वापरण्यास निर्बंध लागू .
ज्याअर्थी, पोलीस अधिक्षक, सातारा यांनी त्यांचेकडील पत्र जिविशा - 7 / गणेशोत्सव / लेझर 163
आदेश / 2024-6989 दि. 06/09/2024 अन्वये सातारा जिल्ह्यात दि. ०७/०९/२०२४ ते दि १७/०९/२०२४ या गणेशोत्सव कालावधीत प्लाझा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईट वापरण्यास निर्बंध लागू करण्यात येत आहेत.
कालावधीत गणेशोत्सव साजरा होत आहे. त्या दरम्यान सातारा जिल्हयात दिड दिवस, तिसरा दिवस ते अनंत चतुदर्शी दरम्यान गणेश मुर्तीचे विसर्जन होते व सदर विसर्जन मिरवणूक प्रसंगी विविध गणेश मंडळे प्लाझा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. सदर प्लाझमा, बीम लाईटआणि लेझर बीम लाईटचे प्रखर प्रकाशामुळे रस्त्यावरून जाणारे वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून सदर वाहन मिरवणूकीमध्ये जावू शकते व त्यामुळे अनुचीत प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचे प्रखर प्रकाशामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले व मिरवणुक पाहण्यास आलेले लहानमुले,वयोवृध्द, जेष्ठ नागरिक, सामान्य नागरिक यांचे डोळ्यास इजा होवून त्यांचे आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने सातारा जिल्हयातील गणेशोत्सव कालावधीत गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापरावर निबंध घालणे आवश्यक आहे. तरी दिनांक ०८/०९/२०२४ रोजी सकाळी ०७.०० वा. पासून ते दिनांक १८/०९/२०२४ रोजीचे १२.०० वा. पर्यंत सातारा जिल्हयामध्ये प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचा वापर करू नये म्हणुन भारतीय नागरीक सुरक्षा सहिंता कलम १६३ प्रमाणे बंदी घालणे आवश्यक असलेची बाब संबंधित अधिकारी यांच्या निदर्शनास आणलेली आहे.
त्याअर्थी, सातारा पोलीस अधीक्षक श्री.समीर शेख व जितेंद्र डूडी, जिल्हा दंडाधिकारी, सातारा यांना असलेल्या अधिकारान्वये, सातारा
जिल्हयामध्ये दिनांक १२/०९/२०२४ रोजीचे ००.०० वा पासून ते दिनांक १८/०९/२०२४ रोजीचे १२.०० वा.पर्यंत या कालावधीसाठी गणेश विसर्जन मिरवणुकीत / कार्यक्रमात, कोणत्याही वक्ती किंवा गणेश मंडळ किंवा कार्यक्रम आयोजक यांनी प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईट वापरात / उपयोगात आणू नये यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 प्रमाणे वापरास प्रतिबंध करणेत येत आहे.
Post a Comment
0 Comments