सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
बडेखान-काळज नजीक हॉटेल विरंगुळा समोर पिकअप गाडीचा अपघात.
फलटण लोणंद हायवेवरील काळज गावच्या हद्दीमध्ये हॉटेल न्यू विरंगुळा समोर गोविंद दुध डेअरी फलटण येथील दुधाचे पॅकेजिंग घेऊन फलटण इथुन पुण्याकडे भरधाव वेगाने जाणारा पिकअप टेम्पो क्रमांक MH11 DD 5129 चालकाच्या चुकीमुळे वाहन रस्त्याच्या दुभाजकाला आदळून पलटी झाल्याचे दिसून आले.राहुल मोरे असे चालकाचे नाव असून त्याला गंभीर दुखापत झालेली नसुन चालक व त्याच्या बरोबर असणारा त्याचा सहकारी हे दोघेजण सुरक्षित आहेत.
या घटनेमध्ये निदर्शनास आले की या गाडीचा चालक व त्याचा सहकारी किती बेजबाबदार आहेत त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की अपघात रात्री २:३० वाजण्याच्या सुमारास घडला. परंतु या दोघांनीही रात्रीच्या वेळेस घडलेल्या घटनेच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रिफ्लेक्टर अथवा कुठलीही उपाय योजना केली नाही.अपघाताची अवस्था पाहीली असता संपूर्ण रोड मध्ये पॅकेजिंग चा डबा एका साईडला पडलेला व पिकप गाडी वेगळी पलटी झालेल्या अवस्थेत होती. घटनास्थळ हे भयंकर धोकादायक असुन चालकाने आपले वाहन रस्त्यातून बाजूला करण्यासाठी हाकेच्या अंतरावर क्रेन असताना सुद्धा फलटण हुन सकाळी उशिरा क्रेन बोलविली. याच्या वरूनच समजते की वाहन चालक किती बेजबाबदार आहेत.
Post a Comment
0 Comments