सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
बोरगाव येथे १,११,०००/-किंमतीचा गांजा व १,३०,००/-किंमतीची मोटार सायकल १०,०००/-किंमतीचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त.
(स्थानिक गुन्हे शाखा सातारा व बोरगाव पोलीस स्टेशन यांची कारवाई.)
बोरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील बोरजाई मंदीर बोरगाव येथे अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता आलेल्या
एका आरोपीस ताब्यात घेऊन त्याचेकडुन १,११,०००/- रुपये किंमतीचा ४.४४० कि. ग्रॅम गांजा,
१,३०,००/- रुपये किंमतीची मोटर सायकल व १०,०००/- रुपये किंमतीचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त
करणेत आला आहे.
श्री.समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी
अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना अंमली पदार्थ गांजा विक्री, लागवड व वाहतुक करणारे
इसमांचे विरुध्द कारवाई करण्याच्या सुचना दिलेल्या होत्या.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पोउनि विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील
पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना सातारा जिल्हयातील अंमली पदार्थ गांजाची विक्री, वाहतुक व लागवड
करणाऱ्या इसमांची माहिती प्राप्त करुन त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
दि. २५/०९/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती
प्राप्त झाली की, टिव्हीएस मोटर सायकल क्रमांक एम. एच. ११ / डी. क्यु ०२६३ वरुन एक इसम पुणे बेंगलोर हायवे
रोडवरील बोरजाई मंदीरासमोर बोरगाव ता. जि. सातारा येथे गांजा विक्री करण्याकरीता येणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी
पोउनि श्री विश्वास शिंगाडे यांना पथकासह नमुद ठिकाणी जाऊन प्राप्त माहितीतील इसमास ताब्यात घेऊन त्याचेवर
कारवाई करण्याचे आदेश दिले नमुद पथकाने प्राप्त माहितीचे ठिकाणी जाऊन बोरगाव पोलीस ठाणेचे सपोनि श्री रविंद्र
तेलतुंबडे व अंमलदार यांचे मदतीने सापळा लावुन एका इसमास ताब्यात घेतले व त्याचेकडुन १,११,००० /- रुपये
किंमतीचा ४.४४० कि.ग्रॅम गांजा, १,३०,०००/- किंमतीची मोटर सायकल व १०,०००/- रुपये किंमतीचा मोबाईल असा
एकुण २,५१,०००/- रुपये किंमतीचा माल हस्तगत करुन त्याचे विरुध्द बोरगाव पोलीस स्टेशन गुरन ४४२ / २०२४
एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (II) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस
अधीक्षक सातारा, यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, परि. पोलीस उप-
अधिक्षक श्री शाम पानेगावकर, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित
फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, अंमलदार अतिष घाडगे, शिवाजी गुरव, विजय कांबळे, संजय
शिर्के, मंगेश महाडीक, लक्ष्मण जगधने, मोहन नाचण, अमित झेंडे, अजय जाधव, प्रविण कांबळे, राजु कांबळे, शिवाजी
भिसे, प्रविण पवार, सचिन ससाणे, स्वप्निल दौंड, संभाजी साळुंखे, दलजित जगदाळे, राजीव कुंभार, अमोल निकम,
रुद्रायन राऊत बोरगाव पोलीस ठाण्याचे अंमलदार प्रशांत चव्हाण, केतन जाधव, संजय जाधव यांनी सहभाग घेतला
असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली
कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment
0 Comments