सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
सुरवडी येथील घरफोडीचा गुन्हा उघड.(सातारा पोलीसांचे सर्व स्तरातून कौतुक)
दिनांक १६/०४/२०२४ रोजी सकाळी ११.००ते १.३० वा. चे दरम्यान मौजे सुरवडी ता.फलटण जि. सातारा येथील अमोल भोसले यांच्या घराचे अज्ञात चोरटयांनी गेटचे कुलुप व घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडुन आत प्रवेश करुन ४,१०,००० /- रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी केली होती. सदर या बाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गुरनं ४२९/२०२४ भादविक ४५४, ३८० अन्वये दिनांक १६/०४/२०२४ रोजी गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
तपास पथकांनी गुन्हयाच्या घटनास्थळी वेळोवेळी भेटी देवून फिर्यादी, साक्षीदार व आजुबाजूच्या लोकांच्याकडे कौशल्याने तपास केला, घटनास्थळ परिसरात तांत्रिक तपास करुन गोपनिय माहितीच्या आधारेसदरचा गुन्हा हा आरोपी सोन्या उर्फ सोमा उर्फ लाल्या ईश्वर भोसले रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर याने केला असल्याचे निष्पन्न केले. नमुद आरोपी हा शरीराविरुध्द व मालमत्तेच्या गुन्हयातील कुख्यात गुन्हेगार ईश्वर उर्फ ईश्वऱ्या भोसले याच्या २७ मुलांपैकी सर्वांत मोठा मुलगा असून त्याचेवर अहमदनगर, बीड, नाशिक, उस्मानाबाद,सातारा, सोलापूर या जिल्हयामध्ये व कर्नाटक राज्यामध्ये शरीराविरुध्द व मालमत्तेच्या एकूण ४१ गुन्हे दाखल होते
दिनांक १५/०५/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना सदर आरोपी सोन्या उर्फ सोमा उर्फ लाल्या ईश्वर भोसले रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर हा फलटण परिसरात सांगवी गावाच्या शिवारात दाट झाडीमध्ये लपुन बसला असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी तपास पथकास सदर आरोपी यास ताब्यात घेवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उप-निरीक्षक,विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार अमोल माने, शिवाजी भिसे, केतन शिंदे, दलजित जगदाळे यांनी सदर ठिकाणी जावुन आरोपी ज्या ठिकाणी लपुन बसलेला होता, त्याठिकाणी अचानक छापा टाकला असता सदर आरोपीने पोलीसांची चाहुल लागताच त्याच्याकडील गाडीवरून पळुन जाण्याचा प्रयत्न केला पथकाने अतिशय शिताफीने त्याचा पाठलाग करून त्याचेवर झडप घालुन त्यास व त्याच्याकडील दुचाकी वाहन ताब्यात घेतले. त्यानंतर पथकाने त्यांच्याकडे कसोशिने व कौशल्याने तपास करुन त्याचेकडुन घरफोडीचोरीचे ०७, चोरीचे ०२ असे एकुण ०९ गुन्हे उघड करुन चालु बाजार भावाप्रमाणे १९,४४,०००/- रुपये किंमतीचे २७ तोळे सोन्याचे दागिने, ५,४१,८००/- रूपये किंमतीची ६ किलो चांदीचे दागिने, ५०,०००/- रूपये रोख रक्कम, १,००,०००/- रूपये किं.चे. दुचाकी वाहन, गुन्हयात वापरलेली कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, हातोडा असा एकुण २६,३५,८००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.माहे नोव्हेंबर २०२२ पासून स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, इतर चोरी असे एकुण २८५ गुन्हे उघड करुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यापैकी ६१२ तोळे (६ किलो१२० ग्रॅम) सोने किंमत रुपये ४,२६,८४,९००/- ( चार कोटी सव्वीस लाख चौऱ्याऐंशी हजार नवशे रुपये ) किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा,अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121
Post a Comment
0 Comments