Type Here to Get Search Results !

जरंडेश्वर परिसरात अज्ञात महिलेच्या खुणाचा तपास २४ तासात उघड.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

जरंडेश्वर परिसरात अज्ञात महिलेच्या खुणाचा तपास २४ तासात उघड.


( स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व कोरेगाव पोलीस ठाणे यांची कारवाई)

( अज्ञात महिलेचा अज्ञात इसमाने केलेल्या क्लिष्ट खुनाचा गुन्हा २४ तासाचे आत उघड.)

दि.०४/०६/२०२४ रोजी सायंकाळी ५.३० वा. चे. पुर्वी मौजे रेवडी ता. कोरेगाव गावचे हद्दीत मळवी नावाचे

शिवारालगत जरंडेश्वर मायनर शेजारी कृष्णा मोरे यांचे शेतालगत धोम डावा कॅनॉलमध्ये एक अनोळखी महिलेचा

हात बांधलेला, सडलेला मृतदेह असल्याची माहिती सौ. रुपाली धनसिंग शिंदे पोलीस पाटील रेवडी यांनी कळविली,

सदरची माहिती प्राप्त होताच श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक

सातारा, श्रीमती सोनाली कदम उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा ग्रामिण, पोलीस निरीक्षक अरुण देवकर,

पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट दिली. मृतदेहाची पाहणी केल्यानंतर घातपाताचा

प्रकार असल्याचे आढळून आल्याने पोलीस पाटील रेवडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोरेगाव पोलीस ठाणे

गु.र.नं.२४५/२०२४ भादविक ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अज्ञात

मृत महिलेची ओळख पटवून सदरचा खुनाचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याच्या सुचना श्रीमती सोनाली कदम

उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा ग्रामिण, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ

यांना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा सातारा व कोरेगाव पोलीस ठाणेकडील तपास पथके तयार करण्या

आली.

सर्व प्रथम मृतदेहाची ओळख पटविण्याकरीता तपास पथकांनी मृतदेहाच्या अंगावरील कपडे, दागिणे याच्या

वर्णनावरुन ICJS प्रणाली वरुन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सदरच्या वर्णनाच्या महिलेबाबत श्रीगोंदा

जिल्हा अहमदनगर येथे मिसींग दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली. प्राप्त झालेल्या माहितीवरुन श्रीगोंदा पोलीस

ठाणे येथील मिसींग व्यक्तींच्या अभिलेखाची तपासणी केली असता त्यामध्ये मयताच्या वर्णनाशी मिळती जुळती सुभद्रा

राजेंद्र मुंढेकर वय ४० वर्षे रा. मुंढेकरवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर या नावच्या महिलेची मिसींग आढळून आली.

त्यानंतर तपास पथकांनी मिसींग महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क साधला सदरची महिला दि. २८/०५/२०२४ रोजी रात्री

११.०० वा.च्या सुमारास घरातून राजेंद्र जगन्नाथ देशमुख रा. मुंढेकरवाडी ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर नावच्या

इसमासोबत निघून गेल्याचा संशय व्यक्त केला. त्यावरुन तपास पथकांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे नमुद इसमाचा शोध

घेतला असता सदरचा इसम हा मुंढेकरवाडी ता. श्रीगोंदा येथे असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस निरीक्षक

धनशाम बल्लाळ तपास पथकासह श्रीगोंदा जि. अहमदनगर येथे रवाना झाले, व तपास पथकाने नमुद इसमास ताब्यात

घेतले.

गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेतलेल्या राजेंद्र देशमुख याचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने विचारपुस केली असता

त्याने सांगीतले की, मृत महिला सुभद्रा मुंढे व त्याचे प्रेम संबंध होते, सदरची महिला त्याच्या सोबत एकत्र राहण्याची

जबरदस्ती करीत होती, म्हणून मी दि. ३०/०५/२०२४ रोजी सुभद्रा मुंढेकर हिला माझा मित्र बिभीषन सुरेश चव्हाण

रा.बाभुळगाव ता.इंदापूर जि. पुणे याचेसोबत त्याच्या टाटा सुमो गाडीतून गोवा येथे फिरण्याकरीता घेवून गेलो होतो,

दि.०२/०६/२०२४ रोजी परत गावी जाण्याचे ठरविल्यानंतर मृत महिला सुभद्रा मुंढेकर हिने राजेंद्र देशमुख यास घरी

जायचे नाही मला तुझ्या सोबत रहायचे आहे असा तगदा लावल्यामुळे राजेंद्र देशमुख याला सुभद्रा मुंढेकर हिचा राग

आला व त्याने त्याचा मित्र बिभीषन चव्हाण याचे सोबत काटा काढायचे ठरविले. दि.०३/०६/२०२४ रोजी राजेंद्र

देशमुख, बिभीषन चव्हाण व मृत महिला सुभद्रा मुंढेकर परत श्रीगोंदा येथे जाण्याकरीता निघाले. सायंकाळी ७.००

वा.च्या सुमारास रेवडी ता. कोरेगाव गावचे हद्दीत आल्यानंतर मळवी नावाचे शिवारालगत जरंडेश्वर मायनर धोम डावा

कॅनॉल येथे आल्यानंतर राजेंद्र देशमुख याने बिभीषन चव्हाण याचे मदतीने सुभद्रा मुंढेकर हिचे हात बांधून, गळा

आवळून, तिचा खुन करुन मृतदेह धोम डावा कॅनॉलचे पाण्यामध्ये टाकून दिला होता असे सांगीतल्याने सदरचा क्लिष्ट

खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यास तपास पथकांना यश प्राप्त झाले आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments