Type Here to Get Search Results !

सातारा जिल्हातील ३ घरफोडीचे गुन्हे उघड स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची दमदार कारवाई.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

सातारा जिल्हातील ३ घरफोडीचे गुन्हे उघड स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची दमदार कारवाई.


पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून ०३ घरफोडीचे गुन्हे उघड करुन चालु बाजारभावाप्रमाणे

१८,३६,०००/- रुपये किंमतीचे २५.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त.

श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी

सातारा जिल्हयामध्ये घडलेले घरफोडीचे गुन्हे उघड करण्याच्या सुचना श्री अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे

शाखा,सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांनी घरफाडीचे गुन्हे उघड

करण्याकरीता सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या अधिपत्त्याखाली एक विशेष तपास पथक तयार केले

असून त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.

श्री अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांना पोलीस अभिलेखावरील आरोपींनी सातारा जिल्हयामध्ये घरफोडीचे

गुन्हे केले असल्याची माहिती प्राप्त झाली होती, त्याप्रमाणे यापुर्वी पोलीस अभिलेखावरील १) रमेश महादेव कुंभार रा.

ठाणे २) निलेश शामराव गाढवे रा.बनवडी ता. कोरेगांव जि.सातारा यांना अटक करुन त्यांच्याकडून ३ घरफोडीच्या

गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यापैकी ५२ तोळे वजनाचे चालू बाजारभावाप्रमाणे ३६,४०,०००/- रुपये

किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत.

सदर आरोपी यांचा साथीदार रफिक महमुद उर्फ मेहबूब शेख रा. पहिली राबोडी जुम्मा मशिदीचे मागे

बापूजीनगर राबोडी ठाणे हा परागंदा होता. सदर आरोपी यास फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गुरनं १५९२ / २०२३

भादंवि कलम ४५४, ४५७, ३८०, ३४ या गुन्हयामध्ये अटक करुन त्याच्याकडे कौशल्याने तपास करुन त्याने सातारा

जिल्हयामध्ये ३ घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न करुन त्याच्याकडून २५.५ तोळे वजनाचे, चालू

बाजारभावाप्रमाणे १८,३६,००० /- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करुन सातारा जिल्हयातील ३ घरफोडीचे

गुन्हे उघड केले आहेत.

माहे नोव्हेंबर २०२२ पासून स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, इतर चोरी असे

एकुण २८५ गुन्हे उघड करुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यापैंकी ६३७.५ तोळे (६ किलो ३७५

ग्रॅम) वजनाचे ४,४५,२०,९००/- (चार कोटी पंच्चेचाळीस लाख वीस हजार नऊशे रुपये ) किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस

अधीक्षक सातारा, यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सहायक पोलीस

निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, तानाजी माने

पोलीस अंमलदार सुधीर बनकर, अतिष घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, लक्ष्मण जगधने, लैलेश

फडतरे, सचिन साळुंखे, अमोल माने, जयवंत खांडके, हसन तडवी, अजित कर्णे, अरुण पाटील, अमित माने, मनोज

जाधव, प्रविण कांबळे, राजु कांबळे, अविनाश चव्हाण, स्वप्निल कुंभार, विक्रम पिसाळ, मोहन पवार, स्वप्निल दौंड,

केतन शिंदे, धीरज महाडीक, सचिन ससाणे, प्रविण पवार, वैभव सावंत, शिवाजी गुरव, पंकज बेसके, अमृत कर्पे,

संभाजी साळुंखे, दलजित जगदाळे, विजय निकम यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व

अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनीअभिनंदन केले आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments