Type Here to Get Search Results !

लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील तडीपार आरोपीस लोणंद पोलिसांनी केले जेरबंद.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील तडीपार आरोपीस लोणंद पोलिसांनी केले जेरबंद.


 (लोणंद पोलीस स्टेशन डी.बी पथकाची सातत्यपुर्ण कामगिरी

तडीपार इसमास केले जेरबंद )

लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील हद्दपार इसम शेखर शरद खताळ वय ३२ वर्षे रा. कापडगाव

ता. फलटण जि.सातारा यास मा. उपविभागिय अधिकारी तथा दंडाधिकारी फलटण यांनी त्यांचकडील

आदेश क्र. एमएजी/ हद्दपार / एसआर- ०१ / २०२३ दि.०५/०१/२०२४ अन्वये पारीत करुन सदर इसमास

दि.२५/०१/२०२४ रोजी बजावणी करुन पुर्ण फलटण व वाई विभागातुन सहा महीन्याकरीता हद्दपार केले

होते.मा.पोलीस अधीक्षक साो सातारा समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक साो. आंचल दलाल मॅडम,

मा.उपविभागीय पोलीस अधीकारी साो. राहुल धस यांनी हद्दपार इसम हद्दीत मिळुन आल्यास त्याचेवर

कडक कारवाई करण्याबाबत प्रभारी अधिकारी यांना सुचना दिल्या होत्या

दि.१८/०६/२०२४ रोजी श्री सुशिल भोसले प्रभारी अधिकारी लोणंद पोलीस स्टेशन यांचे

आदेशान्वये डीबी पथकातील पोकॉ विठ्ठल काळे व पोकॉ केतन लाळगे हे पेट्रोलिंग करीता रवाना झाले

होते. मौजे खराडेवाडी ता. फलटण गावचे हद्दीत वरील अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना १७.०० वा चे

सुमारास सह्याद्री ढाब्याचे समोर लोणंद फलटण रोडवर हद्दपार इसम नामे शेखर शरद खताळ वय ३२

वर्षे रा.कापडगाव ता.फलटण जि.सातारा हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द लोणंद

पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात

आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोहवा योगेश कुंभार हे करीत आहेत. तसेच सदर आरोपी हा शिरवळ

पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर २०३ / २०२४ भा.द.वि. कलम ३२५, ३४१, ५०४, ५०६, ३४ सह आर्म अॅक्ट

३,२५ प्रमाणे दिनांक १४/०६/२०२४ रोजी दाखल असुन सदर गुन्हयात पाहीजे असलेला आरोपी आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक साो सातारा समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक

साो. आंचल दलाल मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी साो. राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली

लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशिल भोसले, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे

पोहवा. संतोष नाळे, सर्जेराव सुळ, विठ्ठल काळे, केतन लाळगे, तसेच पोहवा विजय पिसाळ, नितीन

भोसले, मपोकॉ अश्विनी माने, ऋतुजा शिंदे यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला असुन मा. पोलीस

अधिक्षक सो सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments