Type Here to Get Search Results !

मोरया ग्रुप ४१ महाराष्ट्र राज्य आणि अभंग फाउंडेशन यांच्या तर्फे इयत्ता १० वी, व १२ वी. च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व कौतुक सोहळा

सह्याद्री निर्भिड न्यूज 

सह्याद्री निर्भिड न्यूज/वैभव जगताप 

 मोरया ग्रुप ४१ महाराष्ट्र राज्य आणि अभंग फाउंडेशन यांच्या तर्फे इयत्ता १० वी, व १२ वी. च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व कौतुक सोहळा.





मोरया ग्रुप ४१ महाराष्ट्र राज्य आणि अभंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मौजे गोळेगणी ता.पोलादपुर जि.रायगड पंचक्रोशीतील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व कौतुक सोहळा  दिनांक 27 जून 2024 रोजी सन्माननीय प्रमुख पाहुण्या सुषमाताई भरत शेठ गोगावले व चंद्रकांत दादा कळंबे  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. तसेच गोळेगणी पंचक्रोशीतील सर्व प्राथमिक शाळा माध्यमिक विद्यालय यांच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप या संस्थेमार्फत करण्यात आले, तसेच गेल्या 3 वर्षापासून अभंग फाउंडेशन ही  अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी दत्तक योजनेतून पूर्ण वर्षाचा शैक्षणिक खर्च अभंग फाउंडेशन ही संस्था करते तसेच तसेच गोळेगणी हायस्कूलमध्ये काही एसटी बसने प्रवास करतात त्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पास  वर्षभरासाठी काढून देण्यात आले  या कार्यक्रमासाठी पोलादपूर तालुका शिवसेना प्रमुख निलेशजी आहिरे साहेब, तसेच नगराध्यक्ष पोलादपूर नगरपरिषद नगराध्यक्ष नागेशजी पवार साहेब, गोळेगणी गावचे तंटामुक्त अध्यक्ष अंकुशराव मोरे, पोलीस पाटील उषाताई येरुणकर तसेच अभंग फाउंडेशनचे संस्थापक सल्लागार उपसरपंच ग्रामपंचायत गोळेगणी माननीय श्री ज्ञानेश्वर दादा मोरे, अभंग फाऊंडेशन अध्यक्ष सोपान मोरे, सचिव रुपेश मोरे, खजिनदार अनिकेत भवारी, सपंर्क प्रमुख अक्षय पालेकर, संकेत मोरे,पंचक्रोशीतील सर्व मुख्याध्यापक केंद्रप्रमुख प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचे शोभा वाढवली या कार्यक्रमाची सांगता स्नेह भोजनाने करण्यात आली .


बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments