Type Here to Get Search Results !

सातारा तालुका पोलीस ठाणे हददीत 6 तोळे सोने चोरुन घेऊन गेलेले दागिने हस्तगत व महिलेस अटक

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

सातारा तालुका पोलीस ठाणे हददीत 6 तोळे सोने चोरुन घेऊन गेलेले दागिने हस्तगत व महिलेस अटक .


(सातारा तालुका पोलीस ठाणे डी.बी पथकाची कामगिरी)

सातारा तालुका पोलीस ठाणे दिनांक 21/06/2024 रोजी फिर्यादी सौ. दिपाली संतोष बोराटे रा. वडुथ ता. जि. सातारा यांनी

घरातुन त्यांचे 6 तोळे सोने व चांदीचे दागिने चोरुन घेऊन गेलेबाबतचा गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्हयाचे अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक सो, सातारा, समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक साो, सातारा,

श्रीमती आंचल दलाल, मा. उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा श्री राजीव नवले यांचे मार्गदर्शनाखाली सातारा

तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री निलेश तांबे यांनी सदर गुन्हयातील आरोपीस तात्काळ ताब्यात घेणेबाबत सुचना

दिल्याने सातारा तालुका पोलीस ठाणेचे डी.बी. पथकाने सदर आरोपीची गोपनिय माहिती मिळवुन एका संशयित महिलेस मौजे

कळंबे ता.जि.सातारा येथुन ताब्यात घेऊन तिच्याकडे कसोशीने चौकशी केली असता चौकशी दरम्यान सदर महिला ही तक्रारदार

हिची नातेवाईक असुन तिने तक्रारदार यांच्या घरातुन सदर सोने व चांदी चोरुन घेऊन गेलेची कबुली दिली तसेच तिचेकडुन 6

तोळे सोने व चांदिचे दागिने ताब्यात घेऊन सदर गुन्हयामधील महिलेस अटक केली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास श्री

एस. के. शिंदे परि. पोलीस उपनिरीक्षक हे करित आहेत.

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक साो, सातारा, समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक साो, सातारा, श्रीमती

आंचल दलाल, मा.उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा श्री राजीव नवले, सातारा तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी

अधिकारी श्री निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. एस. के. शिंदे, पोलीस

उपनिरीक्षक अभिजीत गुरव, पोहवा राजु शिखरे, पोहवा मालोजी चव्हाण, पोना किरण जगताप, पोकॉ शिवाजी डफळे,

पोकॉ संदिप पांडव, होमगार्ड विवेक शेडगे, होमगार्ड विठठल सावंत यांनी केलेली आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments