Type Here to Get Search Results !

फलटण तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या समिती अध्यक्षपदी-बापुराव गावडे

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

फलटण तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या समिती अध्यक्षपदी-बापुराव गावडे. 



फलटण तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या समिती अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,यांचे कट्टर समर्थक व खटके वस्ती ग्रामपंचायत विद्यमान लोकनियुक्त सरपंच बापूराव गावडे यांची निवड झाली आहे.गावडे हे यापूर्वी या समितीच्या अध्यक्षपदी कार्यरत होते. त्यांच्या एकंदरीत कामकाज अनुभवावरून त्यांची अध्यक्षपदी फेर नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीवर हेमंत सुतार, सुखदेव फुले, राजेंद्र काकडे, दिलीप अडसूळ, दत्तात्रय गुंजवटे, व काशिनाथ शिंदे त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ही समिती गठित करण्यात आली आहे.सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या शिफारसीनुसार ही समिती गठीत करण्यात आली आहे. सर्व समिती सदस्य व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments