Type Here to Get Search Results !

ड्रोन चा वापर करून चोरी करत असल्याच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये-पोलीस निरीक्षक -सुनील महाडीक

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

ड्रोन चा वापर करून चोरी करत असल्याच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये-पोलीस निरीक्षक -सुनील महाडीक.


सर्व पोलीस पाटलांना कळविण्यात येते की साखरवाडी भागामध्ये ड्रोन ने निरीक्षण करून चोऱ्या केल्या जात आहेत अशी अफवा आहे

काही ठिकाणी साखरवाडी, जिंती, होळ, या परिसरात ड्रोन दिसून आले आहेत हेही खरे आहे.


अश्या प्रकारे कोणतीही चोरी फलटण ग्रामीण ला दाखल नाही 

आता अनेक फोटोग्राफर लोकांकडे किंवा हौशी लोकांकडे ड्रोन आहेत त्यातील काही लोक खोडसाळ पणाने ड्रोन रात्री रिमोट साह्याने आकाशात सोडत आहे 

असे लोकांची गोपनीय माहिती असेल तर फलटण ग्रामीण पोलीसला द्यावी 

अफवेमुळे उगाच एखादे वाहन रात्री अली तर मारहाण करू नये चौकशी करा शंका आली तर पोलीसला कळवा किंवा ११२ला फोन करा 

आपले पलिकडे बारामती दौंड परिसरात पण या प्रकारे ड्रोन दिसूनआले आहेत व अफवा पण आहेत याचा छडा लवकर लागेल पण कोणीही घाबरून जाऊ नये 

बारामती विमानतळावरून काही शिकवू चार्टर प्लेन पण रात्री फिरतात त्याबाबत पण माहिती घेत आहोत 

आपले भागात ज्या लोकांकडे ड्रोन आहेत त्याबाबत गोपनीय माहिती द्यावी 

पोलीस महसूल परवानगी शिवाय ड्रोन उडवता येत नाही परंतु लग्न स्मारंभात याची मागणी असले मुले अनेक लोकांकडे ड्रोन आहेत 

अफवा न पसरवता पोलिसांना माहितीद्यावी.नागरिकांनी घाबरून जाऊ नये. 

सुनील महाडिक- पोलीस निरीक्षक, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments