सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ वैभव जगताप
साखरवाडी मित्रमंडळ , पुणे यांचे वतीने साखरवाडी विद्यालयातील १० वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान.
साखरवाडी विद्यालयातील मार्च २०२४ च्या इयत्ता १० वी शालांत परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना साखरवाडी मित्रमंडळ , पुणे या संस्थे मार्फत रोख रकमेची पारितोषिके देवून सन्मानित करण्यात आले.साखरवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री धनंजय दादा साळुंखे पाटील व साखरवाडी शिक्षण संस्था संचालक माननीय श्री राजेंद्र भोसले यांचे शुभहस्ते ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या एकूण १५ विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.विद्यालयातील सहाय्यक शिक्षक तथा साखरवाडी विद्यालय माजी विद्यार्थी संघाचे कार्यवाह श्री हरिदास सावंत यांनीही स्वतः मार्फत काही रोख रकमेची बक्षिसे विद्यार्थ्यांना प्रदान केली.कार्यक्रमास विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री तुळशीदास बागडे सर , साखरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माननीय श्री सुरेश दादा भोसले , सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी , परिसरातील पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. संस्था अध्यक्ष माननीय श्री धनंजय दादा साळुंखे पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हरिदास सावंत यांनी केले.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121
Post a Comment
0 Comments